तीन महिन्यांपासून आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा ; कोरोनामुळे लॉटरीनंतरही प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 05:38 PM2020-06-19T17:38:40+5:302020-06-19T17:51:43+5:30

राज्यभरातील आरटीई प्रवेशप्रक्रिया कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झाली असून, नाशिकमधील पाच हजार ३०२ विद्यार्थ्यांसह राज्यभरातील १ लाख ९२७ विद्यार्थांच्या पालकांना प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.

Waiting for RTE admission for three months; The corona delayed the process even after the lottery | तीन महिन्यांपासून आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा ; कोरोनामुळे लॉटरीनंतरही प्रक्रिया रखडली

तीन महिन्यांपासून आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा ; कोरोनामुळे लॉटरीनंतरही प्रक्रिया रखडली

Next
ठळक मुद्देविद्यार्थी, पालकांना आरटीई प्रवेशाची प्रतीक्षाआरटीई अंतर्गत जिल्ह्यात ५ हजार ५५७ जागा

नाशिक : जिल्ह्यासह राज्यभरातील आरटीई प्रवेशप्रक्रिया कोरोनाच्या फैलवामुळे प्रभावित झाली असून, नाशिकमधील पाच हजार ३०२ विद्यार्थ्यांसह राज्यभरातील १ लाख ९२७ विद्यार्थांच्या पालकांना प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर आरटीई प्रवेशप्रक्रियेतील सोडत जाहीर होऊनही कागदपत्रांची पडताळणी व प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया तब्बल तीन महिने लांबणीवर पडली आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जांची १७ व १८ मार्चला पुणे येथे संगणकीयप्रणालीद्वारे जिल्हानिहाय सोडत काढण्यात आली. या सोडतीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील ४४७ शाळांमधील ५ हजार ५५७ जागांवर प्रवेशासाठी ५ हजार ३०७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रतीक्षा यादीची प्रक्रियाही याच पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार लॉटरी लागल्याचे किंवा प्रतीक्षा यादीमध्ये नाव असल्याचे एसएमएस पालकांना २० मार्चला दुपारनंतर प्राप्त झाले आहेत. परंतु, ज्या विद्यार्थ्यांची लॉटरीमध्ये निवड झालेली आहे. त्यांनी प्रवेशासाठी पुुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच पडताळणी समितीकडे जावे. तसेच प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर दाखविली जाईल. त्या मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी, अशी सूचना आरटीईच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शासनस्तरावर आरटीई प्रवेशप्रक्रियेसंदर्भात कार्यवाहीला सुरुवात झाली असून, पुढील आठवड्यात यासंदर्भात शासनस्तरावरून शिक्षण विभागाला सूचना प्राप्त होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दली आहे. दरम्यान, पुढील प्रक्रियेसंदर्भात राज्यात कोरोनाचा फैलाव होत असल्याने यापूर्वी ३१ मार्चपर्यंत लांबलेली कागदपत्र पडताळणी व प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया १४ एप्रिलपर्यंत लांबली होती. परंतु त्यानंतरही परिस्थिती सुधारणा न झाल्याने राज्यात जवळपास तीन महिने लॉक डाऊन सुरूच राहिल्याने ही प्रवेशप्रक्रियाही तब्बल तीन महिने लांबली आहे. 

Web Title: Waiting for RTE admission for three months; The corona delayed the process even after the lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.