ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात जोरदार पाऊस न झाल्याने परिसरातील खरीप पिकाचे उत्पादन घटते की काय या धास्तीने बळीराजा चिंतित आहे. गेल्या महिन्यापासून जोरदार पाऊसच पडला नसल्यामुळे पिके सुकू लागली आहेत.धरणात अवघा दहा टक्के पाणी आहे. त्यामुळे मार्कंडेय नदी कोरडीच आहे. विहिरींना पाणी उतरले नाही. पाऊस नसल्याने लाल कांद्याची रोपे टाकता येत नाही. साधारणत: पोळा झाल्यानंतर लाल कांद्याची लागवड होते. मात्र पोळा आठ दिवसावर येऊन ठेपला तरी पावसाचा पत्ता नाही. पाण्याअभावी कांदा रोपे टाकली नसल्याने परगावाहून महागड्या दराने रोपे आणावे लागणार आहे.येत्या काही दिवसात जोरदार पाऊस झाला नाही तर खरीप पिके हातची जाण्याची भीती आहे. सुरुवातीला जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने बळीराजा आनंदीत होता. मात्र त्यानंतर एकही दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतित आहे.
ओतूर परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:11 IST
ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात जोरदार पाऊस न झाल्याने परिसरातील खरीप पिकाचे उत्पादन घटते की काय या धास्तीने बळीराजा चिंतित आहे. गेल्या महिन्यापासून जोरदार पाऊसच पडला नसल्यामुळे पिके सुकू लागली आहेत.
ओतूर परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा
ठळक मुद्देओतूर धरणात अवघा दहा टक्के साठा