Waiting for farmers to be compensated | शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

नाशिक : आॅक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सुमारे साडेतीन लाख हेक्टरने वाढला आहे. यावरून पिकांच्या नुकसानीचे गांभीर्य समोर आले आहेच आता रब्बी हंगामाचीही चिंता असल्याने शेतकऱ्यांना निदान खरिपाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकºयांना लागून आहे.
परतीच्या पावसाने जिल्ह्यातील संपूर्ण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतामध्ये पाणी साचल्यामुळे नुकसानीचे क्षेत्र मोठे असण्याची शक्यता तेव्हाच वर्तविली जात होती. जिल्हा प्रशासनाने ३ लाख ८६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. आता पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पीक नुकसानीचा आकडा तब्बल साडेतीन लाख हेक्टरने वाढला आहे.
नुकसानीचे एकूणच गांभीर्य लक्षात घेता सरसकट पंचनामे ग्राह्य धरून त्यानुसार शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी सातत्याने पुढे येत आहेच शिवाय बाधीत शेतकºयांच्या कर्जमाफीचा मुद्दाही जोर धरू लागला आहे. राज्यात अद्याप सरकार स्थापन झाले नसले तर मागील सरकारने दहा हजार कोटींची तरतूद केली आहेच उर्वरित भरपाईसाठी केंद्राकडून मदत मिळविण्यासाठीचे प्रयत्न राजकीय नेत्यांनी सुरू केले आहेत. नुकसानीचा आकडा पाहता ओला दुष्काळ जाहीर करण्यापेक्षाही तत्काळ मदतीसाठी केंद्राचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.
जिल्हातील महत्त्वाचे पीक असलेल्या द्राक्षाचे मोठे नुकसान झालेले आहे. याबरोबरच मका, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कांदा यासह अन्य पिकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार १ हजार ९५९ गावातील ७ लाख ७६ हजार ९७० शेतकरी बाधीत झाले आहे.
प्रशासनाकडून युद्धपातळीवर पंचनामे सुरू होते. त्यापैकी ३ लाख ८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा आकडा ६ लाख ४७ हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावर गेला आहे.
६३६ कोटींच्या मदतीची गरज
जिल्ह्यातील शेतपीकांच्या नुकसानीसाठी सुमारे ६३६ कोटी २३ लाख ३३ रुपयांच्या मदतीची गरज असून तसा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे. जिरायतीसाठी २७८ कोटी ३० लाख, बागायत पिकांसाठी २११ कोटी ७ हजार तर बहुवार्षिक फळपिकांसाठी १४६ कोटी २८ लाख असे एकूण जवळपास ६३६ कोटी २३ लाख ३३ रुपयांच्या मदतीची अपेक्षा आहे.
क्षेत्रानुसार नुकसानीचा अंदाज
जिरायत क्षेत्र : ४ लाक ९ हजार २७५ हेक्टर (१९५८ गावांमधील ५ लाख
५३ हजार ४८४ शेतकरी बाधीत)

बागायती क्षेत्र : १ लाख ५६ हजार ३५० हेक्टर (१ हजार ३६१ गावांमध्ये झाले असून, तेथील २ लाख ३० हजार ७७ शेतकरी बाधीत.

बहुवार्षिक फळपिके : ८१ हजार २७० हेक्टर (१२१५ गावे व १ लाख ४ हजार ३६५ शेतकरी बाधीत)
तालुकानिहाय नुकसानाची आकडेवारी (हेक्टरमध्ये)
नाशिक : १२ हजार ७३२
इगतपुरी : १४ हजार ९८
त्र्यंबकेश्वर : ०८ हजार ५२
दिंडोरी : २४ हजार ५७१
पेठ : १३ हजार ६८३
कळवण : २९ हजार २५३
सुरगाणा : २२ हजार ८११
बागलाण : ७४ हजार २४८
चांदवड : ५७ हजार ७७२
देवळा : ३९ हजार १५८
मालेगाव : १ लाख १४ हजार ९४३
येवला : ५८ हजार ४१३
नांदगाव : ५६ हजार ९४३
निफाड : ६३ हजार ८०७
सिन्नर : ५१ हजार ७३१

Web Title:  Waiting for farmers to be compensated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.