वडनेरभैरवला एकता ग्रुपच्या वतीने सत्कार समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 23:03 IST2019-09-05T23:01:29+5:302019-09-05T23:03:04+5:30
वडनेरभैरव : तालुक्यातील वडनेरभैरव येथील एकता ग्रुपच्या वतीने गणेशोत्सवात घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व, चित्रकला, रंगभरण स्पर्धांयमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना ग्रुपच्या वतीने अभिनव बाल विकास मंदिर, वडनेरभैरव येथे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथे एकता गु्रपच्या वतीने सत्कारप्रसंगी मान्यवर व विद्यार्थी.
वडनेरभैरव : तालुक्यातील वडनेरभैरव येथील एकता ग्रुपच्या वतीने गणेशोत्सवात घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व, चित्रकला, रंगभरण स्पर्धांयमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना ग्रुपच्या वतीने अभिनव बाल विकास मंदिर, वडनेरभैरव येथे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी आण्णासाहेब माळी, तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे सुभाष माळी, चंद्रकांत भंडारे, बाबाजी सलादे, संजय आंबेकर, तसेच मुख्याध्यापक संग्राम निखाडे व सर्व शिक्षक वृंद, एकता ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी बाबाजी सलादे ग्रुपचे मार्गदर्शक संजय भालेराव, सुभाष जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दीपाली गांगुर्डे यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त मुख्याध्यापक संग्राम निखाडे, हरिश्चंद्र देवरे, योगेश ठाकरे, ज्ञानेश्वर जामदार, स्वाती आहेर, अर्चना सोमवंशी, रेखा आहेर शिक्षकांना एकता ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.