वडाळा आरोग्य केंद्राला घाणीचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:35 IST2018-10-12T00:35:49+5:302018-10-12T00:35:57+5:30
वडाळागावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात गाजरगवत आणि घाणीच्या साम्राज्यामुळे रुग्णालयाचे आरोग्यच धोक्यात आले आहे.

वडाळा आरोग्य केंद्राला घाणीचा विळखा
इंदिरानगर : वडाळागावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात गाजरगवत आणि घाणीच्या साम्राज्यामुळे रुग्णालयाचे आरोग्यच धोक्यात आले आहे.
वडाळागावात सादिकनगर, मेहबूबनगर, साठेनगर, मुमताजनगर, झीनतनगर परिसरातील सत्तर टक्के हातावर काम करणारे नागरिकांची वस्ती म्हणून ओळखली जाते. येथील नागरिकांची सुमारे वीस वर्षांपासून असलेली महापालिका रुग्णालयाची मागणी अखेर एक वर्षांपूर्वी पूर्ण होऊन सुमारे वीस खाटांचे रुग्णालय शंभर फुटी रस्त्यालगत बांधण्यात आले. परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाची तपासणी करून प्राथमिक उपचार करून जास्त तब्येत असल्यास त्यास डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय किंवा बिटको रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल करण्यात येते. त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रासास नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच रुग्णालयाच्या चारीबाजूंनी गाजर गवत आणि त्यामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.