शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी वाबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST2021-02-05T05:39:50+5:302021-02-05T05:39:50+5:30
शिवजन्मोत्सव समितीची बैठक नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमाद्वारे साजरी करण्या ...

शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी वाबळे
शिवजन्मोत्सव समितीची बैठक नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमाद्वारे साजरी करण्या बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी समितीची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी- स्वप्निल वाबळे, उपाध्यक्ष - जितेंद्र लासुरे, सचिन भादेकर. सचिव - निखिल बोराडे, उन्मेष गायकवाड, खजिनदार – गणेश शर्मा, महेश वाघ, संघटक- विजय कोरडे, दिनेश शिंदे. प्रसिद्धीप्रमुख- कुणाल शहाणे, संकेत लासुरे, सजावट प्रमुख - भगीरथ गोसावी, सल्लागार– उमेश भोई, रवींद्र चौधरी, सनी जमधडे, संतोष शिंदे, गणेश मुरकुटे आदींची निवड करण्यात आली. बैठकीला बंटी कोरडे, किरण डहाळे, चंदू महानुभव, अंकुश भोसरे, विकास गिते, विक्रांत थोरात, स्वप्निल लवटे, गोरख व्यवहारे, कुमार पगारे, योगेश शिंदे आदी उपस्थित होते. (फोटो ०२ वाबळे)