नाशिक : लोकशाहीचा उत्सव सोमवारी (दि.२१) राज्यात साजरा केला जाणार आहे. हा उत्सव अर्थात विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया शहरात सर्वत्र निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी शहर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. शहरात आयुक्तालय हद्दीत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) ४ तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) २ कंपन्यांचे मिळून सुमारे ६०० जवान दाखल झाले आहेत. शहरातील सर्व मतदान केंद्रांसह स्ट्रॅँगरूमवरदेखील चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत आहे.शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत चार विधानसभा मतदारसंघांत एकूण २५४ केंद्रे आहेत. या केंद्रांवरील सुमारे १ हजार १५४ बूथवर नाशिककर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी ३३ बूथ हे संवेदनशील आहेत. सर्व बूथनिहाय पोलीस बंदोबस्ताची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपविली गेली आहे. त्यानुसार सर्व उपआयुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंदोबस्त तैनात करत आहेत. शहरात सर्वच केंद्रांवर मतदानप्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वोपरी प्रयत्न केले जात आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. सर्वाधिक संवेदनशील केंद्रे भद्रकाली व पंचवटी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असून, या भागात पोलिसांकडून सशस्त्र पोलीस जवानांसह दंगल नियंत्रण पथकाचे जवानही तैनात करण्यात येणार आहे.केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, तसेच केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ)चे जवान निवडणूक बंदोबस्तासाठी शहरात दाखल झाले आहेत. तसेच यासोबत गुजरात एसएपीच्या दोन कंपन्याही दिमतीला बोलाविण्यात आल्या आहेत.असा असेल बंदोबस्त२५४ इमारतींमधील केंद्रांच्या १ हजार १५४ बूथवर ७३५ पोलीस शिपाई, ५७७ होमगार्ड बंदोबस्तावर राहणार आहेत. याव्यतिरिक्त निवडणूक काळात व प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी सहा उपआयुक्त, १९ सहायक आयुक्त, ७० पोलीस निरीक्षक, २०० सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक, १९८ पुरुष शिपाई, सहायक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई ३ हजार, होमगार्ड ७०० असा चोख बंदोबस्त तैनात राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मतदान दक्षता : सीएपीएफ, सीआयएसफच्या सशस्त्र दलाचे शेकडो जवान दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 18:06 IST
Maharashtra Election2019 शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत चार विधानसभा मतदारसंघांत एकूण २५४ केंद्रे आहेत. या केंद्रांवरील सुमारे १ हजार १५४ बूथवर नाशिककर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी ३३ बूथ हे संवेदनशील आहेत.
मतदान दक्षता : सीएपीएफ, सीआयएसफच्या सशस्त्र दलाचे शेकडो जवान दाखल
ठळक मुद्दे३३ बूथ हे संवेदनशील आहेत १ हजार १५४ बूथवर ७३५ पोलीस शिपाई६०० जवान दाखल झाले आहेत.