गुरुजींकडून पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 16:32 IST2019-10-18T16:31:31+5:302019-10-18T16:32:50+5:30
पेठ : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी गावोगावी पथनाट्य सादर करून मतदारांमध्ये जनजागृती केली.

गुरुजींकडून पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती
पेठ : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे सार्वत्रिक निवडणुका. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्र मांद्वारे मतदार जनजागृती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पेठ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी गावोगावी पथनाट्य सादर करून मतदारांमध्ये जनजागृती केली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप भोसले, गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात प्रभातफेरी, पथनाट्य यासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रमेश वाघ, आर. डी. शिंदे, अनिल सांगळे, प्रवीण गायकवाड, सतीश शंकरे, गोरख गायकवाड, उमेश सातपुते, तुषार चौधरी, एकनाथ गांगुर्डे आदी शिक्षकांनी पथनाट्य सादर केले. आठवडे बाजाराचे औचित्य साधून मतदारांच्या शंका समाधानासाठी या पथनाट्यांचा उपयोग झाला.