कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 15:41 IST2020-03-04T15:40:58+5:302020-03-04T15:41:44+5:30
अभोणा : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्र मानुसार कळवण तालुक्यातील अभोणा ग्रामपालिकेसह २८ ग्रामपंचायतींची निवडणूक पहिल्या टप्प्यात होत आहे. २७ फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रि येला सुरुवात झाली असून, दि. २९ मार्च रोजी प्रत्यक्ष मतदान घेतले जाणार आहे.

कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान
तालुक्यातील मेहदर, नरु ळ, ओतूर, भुसणी, मुळाणेवणी, बापखेडा, तताणी, पाळे बु।।, सप्तशृंगगड, मोहनदरी, नांदुरी, भगुर्डी, पळसदर, मोहमुख, ओझर, लिंगामा, बोरदैवत, वडाळे ( हा ), वीरशेत, जामलेवणी, कळमथे, सावकी ( पाळे ), बिलवाडी, देवळीवणी, कुंडाणे (क), काठरे, कनाशी, गोसराणे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्र म :-
- अर्ज भरण्याची मुदत -दि.६ ते १३ मार्च
-अर्जाची छाननी -दि.१६ मार्च
-अर्ज माघारीची मुदत - दि.१८ मार्च
- मतदान - दि.२९ मार्च
-मतमोजणी आणि निकाल -दि.३० मार्च
थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय महाविकास आघाडीने रद्द केल्याने भावी सरपंचांच्या तयारीवर विरजण पडले आहे. आता सदस्यांतूनच सरपंच निवड होणार आहे. दुसरीकडे गावाचा कराभारी कोण होणार हे जनतेच्या हाती न राहिल्याने या निर्णयाबाबत इच्छुक व ग्रामीण भागातील जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.