बारागाव पिंप्री महाविद्यालयात मतदार जागृती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 17:20 IST2019-03-14T17:16:47+5:302019-03-14T17:20:24+5:30
सिन्नर : साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिकरोड संचलित तालुक्यातील बारागाव पिंप्री येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात तहसील कार्यालयातील निवडणुक आयोगामार्फत मतदान जागृती अभियान राबविण्यात आले.

बारागाव पिंप्री महाविद्यालयात मतदार जागृती अभियान
मतदान जगजागृती अभियान उपक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. डी. एल. फरताळे, विद्यार्थी विकास अधिकारी किरण सोनवणे, निवडणुक आयोगामार्फत उत्तम जाधव, दिलीप पवार, विजय वाजे, अस्लम काद्री उपस्थित होते. यावेळी निवडणुक अधिकाऱ्यांनी मतदान जनजागृतीविषयी माहिती दिली व इव्हीएम व व्हीव्हीपॅटद्वारे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी संदीप कापडी. ललीत गांगुर्डे, सुजित हांडोरे, गोरक्षनाथ पगार, संदीप पगार, वृषाली उगले, मंजुश्री उगले, अर्चना सावंत आदींसह शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.