व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 18:48 IST2021-02-24T18:47:13+5:302021-02-24T18:48:09+5:30

नांदगाव : मुंबई सायन्स टीचर असोसिएशनमार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्ही.जे. हायस्कूलमधील दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

V.J. Selection of high school students | व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची निवड

होमी भाभा स्पर्धेत यश मिळालेल्या आरोही व रोहन यांचा सत्कार करताना मुख्याध्यापक दयाराम देवरे. समवेत मार्गदर्शक सुनंदा महाले, निवेदिता सांगळे व शिक्षक.

ठळक मुद्देयंदा ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली.

नांदगाव : मुंबई सायन्स टीचर असोसिएशनमार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्ही.जे. हायस्कूलमधील दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

इ. ६ वी व ९ वी साठी ही परीक्षा घेतली जाते. यंदा ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. त्यात व्ही. जे. हायस्कूलच्या ३१ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यापैकी इ.६ वीतील आरोही शिरोडे व इ.९ वीतील रोहन सुधाकर खैरनार यांना यश मिळाले असून, त्यांची पुढच्या परीक्षेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना सुनंदा महाले, निवेदिता सांगळे यांनी मार्गदर्शन केले.
राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल संस्थेचे सेक्रेटरी अश्विनकुमार येवला, शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे, शशिकांत आंबेकर, मुख्याध्यापक दयाराम अहिरे, पर्यवेक्षक भास्कर जगताप, प्रकाश गरूड, भैयासाहेब चव्हाण, भास्कर मधे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

Web Title: V.J. Selection of high school students