पारंपारिक वेशभूषा साकारत विठूनामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 17:44 IST2019-07-14T17:43:36+5:302019-07-14T17:44:02+5:30
लासलगाव:येथील संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

पारंपारिक वेशभूषा साकारत विठूनामाचा गजर
लासलगाव:येथील संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून यावेळी पारंपारिक वेशभूषा साकारत विठूनामाचा गजर करत, दिंडी मिरवण्यात आली. पालखी सोहळ्यात विठोबाच्या पालखी व दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विठोबाच्या वेशभूषेत अनिकेत संत तर रु क्मिणीच्या वेशभूषेत वेदांश्री पवार हे दोघे विद्यार्थी होते. या दिंडीसाठी मनीषा होळकर नंदा डमरे ,रश्मी दगडे आदी संस्थाचालक उपस्थित होते. मुख्याध्यापिका अश्विनी कुशारे उपमुख्याध्यापिका योगिता पाटील, सारिका पाटील यांनी आरती करून दिंडीची सुरु वात केली. मंगला कदम यांनी सूत्रसंचालनकेले.