प्रती पंढरपूरला विठूनामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 17:53 IST2019-07-12T17:53:27+5:302019-07-12T17:53:39+5:30
कळवणला भाविकांची लोटली गर्दी : पालखी सोहळ्याचा उत्साह

प्रती पंढरपूरला विठूनामाचा गजर
कळवण : गांधी चौक(पंचवटी)येथील प्रती पंढरपूर म्हणून गणल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात शुक्रवारी (दि.१२) आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी उसळली होती. बाल गोपाळांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत काढलेल्या पायी पालखी व दिंडीने कळवणकरांचे लक्ष वेधून घेतले.
श्री विठोबा महाराज मंदिरात पहाटे ५ वाजता साकोरे येथील पोलीस पाटील वसंत आहेर, खालप सोसायटीचे चेअरमन शांतीलाल सूर्यवंशी व खमताने येथील निंबा पवार परिवाराने सपत्नीक महापूजा केली. विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्याने मंदिर परिसरात पोलीस व सुरक्षारक्षक नेमण्याची वेळ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांवर आली. दर्शनासाठी येणा-या प्रत्येक विठ्ठल भक्ताला महाप्रसादाचे मानकरी लक्ष्मण पगार, गिरीश पगार, नंदकुमार पगार, योगेश पगार यांच्याकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.आषाढी एकादशी निमित्ताने मंदिर परिसर सजविण्यात येवून मंडप उभारला होता .
३० दिंड्या दाखल
विठेवाडी पाळे, नरु ळ, मेहदर, ओतूर, सुकापूर, रवळजी, भेंडी, गोपाळखडी आदी तालुक्यातील व परिसरातून विठ्ठल रुक्मिणीच्या भाविकांच्या ३० दिंड्या मंदिर परिसरात दाखल झाल्या होत्या. श्री विठोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुनील शिरोरे ,उपाध्यक्ष सुधाकर पगार ,सरचिटणीस जयंत देवघरे ,विश्वस्त अँड परशुराम पगार ,उपनगराध्यक्ष कौतिक पगार ,शिक्षक नेते कारभारी पगार, संजय मालपुरे ,अशोक जाधव ,हरिश्चंद्र पगार,कृष्णा पगार, के के शिंदे,भावराव पाटील, सुनील कोठावदे, डॉ पी एच कोठावदे,मोतीराम पगार, राजेंद्र पगार, शंकर निकम आदी पदाधिकारीनी दिंडीतील विठ्ठल भक्तांचे व विविध क्षेत्रातील मान्यवरांचे स्वागत केले. दरम्यान, सकाळी कळवण शहरातून जानकाई विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पायी दिंडी काढली. विठ्ठल-रु क्मिणी च्या वेशातील बालकांचा रथ, हातात टाळमृदुंग , डोक्यावर पांढरीटोपी ,कुडता ,धोतर तसेच नऊवारी साडी या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी कळवणकरांचे लक्ष वेधून घेतले.रात्री ह. भ. प. नितीन महाराज मुडावदकर यांच्या जाहीर कीतर्नाचा कार्यक्र म झाला.