ताहाराबाद शाळेस ई-लर्निंग संच भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 00:09 IST2018-11-08T00:08:29+5:302018-11-08T00:09:02+5:30

ताहाराबाद : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ई-लर्निंग प्रोजेक्टर उद्घाटन व विविध कार्यक्र म घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते.

Visit to Taharabad School e-learning set | ताहाराबाद शाळेस ई-लर्निंग संच भेट

ताहाराबाद शाळेस ई-लर्निंग संच भेट

ठळक मुद्दे जयंती दिनानिमित्त उपक्र म राबविण्यात आले.


ताहाराबाद प्राथमिक शाळेस ई-लर्निंग संच देण्यात आला. त्याप्रसंगी डॉ. तुषार शेवाळे, यशवंत पाटील, रेखा पवार, एस.एस. बच्छाव आदी.

 

ताहाराबाद : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ई-लर्निंग प्रोजेक्टर उद्घाटन व विविध कार्यक्र म घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य शिक्षण सभापती यशवंत पाटील, जिल्हा परिषद सदस्य रेखा पवार, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. एस. बच्छाव, सटाणा नगरपालिकेचे माजी नगरसेवक किशोर कदम, हभप रामचंद्र महाराज नंदन, सेवानिवृत्त शिक्षक बी.डी. नंदन, पी.ए. नहिरे आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक धुळे लोकसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन कोठावदे यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे, पंचायत समिती सदस्य संजय जोपळे, सरपंच इंदूबाई सोनवणे, उपसरपंच सीताराम साळवे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकला कोठावदे, सुमनबाई कासारे, नीलेश कांकरिया, राजेंद्र साळवे, दामिनी गांगुर्डे, काशीनाथ नंदन उपस्थित होते.यावेळी शालेय विद्यार्थ्यांना मिठाई वाटप, ४० गरजू विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी कपडे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना दत्तक योजना आदी कार्यक्रम घेण्यात आले. स्व. निंबा कृपाराम कोठावदे (वाणी गुरुजी) यांच्या जयंती दिनानिमित्त उपक्र म राबविण्यात आले.

Web Title: Visit to Taharabad School e-learning set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा