अधिकाऱ्यास कचºयाची फोटोफ्रेम भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:41 AM2019-11-16T00:41:42+5:302019-11-16T00:42:10+5:30

संपूर्ण पंचवटी विभागात घंटागाड्यांचे नियोजन कोलमडले असले तरी मनपा प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही रस्त्यावर खड्डे बुजविण्याची मागणी वारंवार केली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकाने पंचवटी प्रभाग समिती बैठकीत आरोग्य विभागाला कचºयाची आणि बांधकाम विभागाला खड्ड्यांचे छायाचित्र असलेली फोटोफ्रेम भेट देत उपरोधिक आंदोलन केले.

 Visit the officer's photo frame | अधिकाऱ्यास कचºयाची फोटोफ्रेम भेट

अधिकाऱ्यास कचºयाची फोटोफ्रेम भेट

Next

पंचवटी : संपूर्ण पंचवटी विभागात घंटागाड्यांचे नियोजन कोलमडले असले तरी मनपा प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही रस्त्यावर खड्डे बुजविण्याची मागणी वारंवार केली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकाने पंचवटी प्रभाग समिती बैठकीत आरोग्य विभागाला कचºयाची आणि बांधकाम विभागाला खड्ड्यांचे छायाचित्र असलेली फोटोफ्रेम भेट देत उपरोधिक आंदोलन केले.
प्रभागाची बैठक शुक्रवारी (दि.१५) सभापती सुनीता पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठक सुरू होताच अवघ्या दोन विषयांच्या दहा लाख रुपयांच्या कामांना विनाचर्चा करण्यात आली. बैठकीच्या प्रारंभीच प्रभागात घंटागाडी नियमित येत नसल्याने तसेच रस्त्यावरचे खड्डे बुजविले नसल्याने नगरसेवक पूनम मोगरे यांनी आरोग्य आणि बांधकाम विभागाला प्रभागातील सद्य परिस्थितीचे फोटो काढून तयार केलेली फोटोफ्रेम भेट दिली. गेल्या काही दिवसांपासून प्रभागात कचरा पडून असल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे मात्र तरीदेखील प्रशासन घंटागाडी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप मोगरे यांनी यावेळी केला.
पंचवटी विभागात पालापाचोळा जमा करण्यासाठी केवळ एकच गाडी असल्याची तक्रार कमलेश बोडके यांनी करून आतापर्यंत घंटागाडी ठेकेदाराला किती दंड केला तसेच काय कारवाई केली याचा अहवाल सादर करण्याची मागणी केली, तर आडगाव परिसरातील समस्यांबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने तक्रार कोणाकडे करायची? असा सवाल शीतल माळोदे यांनी व्यक्त केला. यावेळी बैठकीत नगरसेवक प्रियंका माने, सारिका सोनवणे, पूनम सोनवणे, अनिल वाघ व महेंद्र आव्हाड, आर. एस. पाटील, वसंत ढुमसे, संजय कानडे, अनिल गायकवाड सहभागी झाले होते.
तुम्हीच सांगा कुठे जायचे आम्ही...
बैठकीत एका लोकप्रतिनिधीने प्रभागातील समस्यांबाबत तक्रार करून दखल घेतली जात नसल्याचे सांगताच अधिकाºयाने एका नगरसेवकाचा मुलगा मनपात बोलवितो तर दुसरा घटनास्थळी बोलवितो. माझ्याकडे दोन विभागांचा अतिरिक्त पदभार आहे काम कसे करायचे, मग तुम्हीच सांगा कुठे जायचे आम्ही आणि काय काय करायचे असे सांगून तुम्ही मला कामाच्या तक्रारींचा कधी फोन केला दाखवून द्या असे सांगत आपली बाजू मांडली.

Web Title:  Visit the officer's photo frame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.