येवला : पालखेड धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे केली होती. मात्र अद्यापही आवर्तन न सोडल्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी आमदार छगन भुजबळ हे नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेणार आहे.पालखेड डावा कालव्याच्या भरवशावर दिंडोरी, निफाड व येवला या लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी रब्बी हंगाम केलेला आहे. शेतकºयांनी प्रामुख्याने ठिबक सिंचनाचा वापर करून द्राक्ष, डाळिंब यासह इतर रब्बीची पिके घेतलेली आहे.
भुजबळ घेणार जिल्हाधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:22 IST