शिवाश्रमच्या पथकाची आनंदवनास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 17:19 IST2019-05-12T17:18:13+5:302019-05-12T17:19:19+5:30
सिन्नर : ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत डॉ. बाबा आमटे यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील आनंदवनास शिवाश्रम पथकाने नुकतीच भेट दिली.

शिवाश्रमच्या पथकाची आनंदवनास भेट
तालुक्यातील मेंढी येथे साकारण्यात येणाऱ्या शिवाश्रम निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे. त्यासंदर्भात सामाजिक संस्थांची कार्यपद्धतीची माहिती घेण्यासाठी सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक मधुकर गीते यांच्या समवेत त्यांनी आनंदवनात जाऊन डॉ. विकास आमटे यांच्याशी चर्चा केली. ध्येय व चिकाटी ठेवून काम केल्यास सामाजिक संस्था टिकतात. अन्यथा स्वार्थाचा स्पर्श संस्थेला लागल्यास संस्था पत्त्याप्रमाणे कोसळतात. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी हिमतीने व ध्येयाने काम केल्यास संस्था व समाजाची प्रगती होते, असा सल्ला आमटे यांनी यावेळी दिला. यावेळी पथकातील सदस्यांनी आनंदवनातील डॉ.बाबा आमटे व साधनाताई आमटे यांच्या समाधी स्थळास भेट दिली. मधुकर गीतेही बाबा आमटे यांचे कार्यकर्ते असून त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन त्यांनी तनपुरे यांना शिवश्रमासाठी ५० गुंठे जागा दान केली आहे. यावेळी पथकात सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक मधुकर गीते, प्राध्यापक प्रकाश खुळे , राहुरीचे उत्तम गाढे, गौरव तनपुरे, बाळकृष्ण तनपुरे यांचा समावेश होता.