नाशिक : माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या पत्नी सौ. सरोज पाटील यांचे पुणे येथे सोमवारी (दि.१३) दुपारी ३ वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.१४) सकाळी १० वाजता नाशिक अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.सरोज पाटील यांच्या पश्चात पती, भक्ती आणि ज्ञानेश्वरी या दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सरोज पाटील यांच्यावर गेल्या महिन्यातच पुणे येथे हृदयशस्त्रक्रिया झाली होती. दोन दिवसात त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. मात्र, सोमवारी दुपारी त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मूळच्या सातारा जिल्ह्यातील अतीत येथील असलेल्या सरोज पाटील यांनी फर्गसन महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी संपादन केली होती. विवाहानंतर त्यांनी गृहिणी म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. विनायकदादा पाटील यांच्या राजकारणातील प्रत्येक टप्प्याच्या साक्षीदार असलेल्या सरोजताई या अतिथ्यशील आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या.
माजी मंत्री विनायकदादा पाटील यांना पत्नीशोक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 17:09 IST
मंगळवारी (दि.१४) सकाळी १० वाजता नाशिक अमरधाममध्ये अंत्यसंस्कार
माजी मंत्री विनायकदादा पाटील यांना पत्नीशोक
ठळक मुद्देमूळच्या सातारा जिल्ह्यातील अतीत येथील असलेल्या सरोज पाटील यांनी फर्गसन महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी संपादन केली होती.