शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्याच्या टेस्टिंग लॅबबाबत संशयाचा व्हायरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 00:59 IST

कोरोनामुळे ‘पॉझिटिव्ह’ हा शब्द धक्कादायक बनला असताना हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव येथील रुग्णाच्या एकच स्वाबच्या नमुन्याचा आधी पॉझिटिव्ह, नंतर निगेटिव्ह रिपोर्ट देण्याचा पराक्रम धुळे येथील कोरोना टेस्टिंंग लॅबने केला आहे. लॅबच्या या कारागिरीमुळे सदर रुग्णाला मनस्ताप तर भोगावा लागलाच शिवाय लॅबचा ढिसाळ कारभारही चव्हाट्यावर आला आहे. एकूणच आजवरच्या रिपोर्टबाबतही या लॅबविषयी संशयाचा व्हायरस घुसला आहे.

ठळक मुद्देकोरोनात जीवाशी खेळ एकाच स्वॅबचे दोन रिपोर्ट, आधी पॉझिटिव्ह; नंतर निगेटिव्ह

नाशिक : कोरोनामुळे ‘पॉझिटिव्ह’ हा शब्द धक्कादायक बनला असताना हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव येथील रुग्णाच्या एकच स्वाबच्या नमुन्याचा आधी पॉझिटिव्ह, नंतर निगेटिव्ह रिपोर्ट देण्याचा पराक्रम धुळे येथील कोरोना टेस्टिंंग लॅबने केला आहे. लॅबच्या या कारागिरीमुळे सदर रुग्णाला मनस्ताप तर भोगावा लागलाच शिवाय लॅबचा ढिसाळ कारभारही चव्हाट्यावर आला आहे. एकूणच आजवरच्या रिपोर्टबाबतही या लॅबविषयी संशयाचा व्हायरस घुसला आहे.मालेगाव शहर हे कोरोना संसर्गाबाबत दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत चालले आहे. मालेगावी रुग्णांचा कोरोना तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की प्रशासकीय यंत्रणेसह ठाकरे सरकारच्याही काळजाचा ठोका चुकतो. मालेगाव येथील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने धुळे येथे कोरोना टेस्टिंंग लॅब (आयसीएमआर लॅबोरेटरी- एसबीएचजीएमसी) कार्यान्वित केली, परंतु पावणेदोन तासांच्या फरकाने दोन भिन्न रिपोर्ट देण्याच्या या प्रकाराने लॅबच्या एकूणच यंत्रणेविषयी संशयास्पद वातावरण तयार झाले आहे.मालेगाव येथील एका व्यक्तीला गुडघ्याच्या शस्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिनांक २६ मे रोजी शस्रक्रियेपूर्वी कोरोना तपासणीसाठी या व्यक्तीच्या घशाचे स्वाब घेण्यात आले आणि ते धुळे येथील टेस्टिंग लॅबकडे पाठविण्यात आले.दिनांक २७ मे रोजी लॅबने सकाळी ८.३९ वाजता सदर व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह पाठविला. या रिपोर्टमुळे त्या व्यक्तीला प्रचंड मानसिक धक्का तर बसलाच शिवाय रुग्णालयातही धावपळ उडाली. रुग्ण मानसिक तणावात असतांनाच १०.२० वाजता दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह पाठविण्यात आला. दोन वेगवेगळे रिपोर्ट आल्यामुळे रुग्णालय व्यवस्थापन गोंधळात पडले. रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने रुग्णाचा जीव भांड्यात पडला पण पावणे दोन तासांच्या फरकाने आलेल्या या भिन्न रिपोर्टमुळे लॅबचा निष्काळजी कारभार त्यानिमित्ताने उघड झाला.तपासणी यंत्रणेवर प्रश्नचिन्हमालेगाव येथून रोज शेकडो स्वॅबचे नमुने तपासणीसाठी धुळे येथे पाठवले जात आहेत. या नमुन्यांची योग्य तपासणी होते किंवा नाही, याबाबत आता संशयाची स्थिती निर्माण झाली आहे. एखादा चुकीचा अहवाल धोकादायक ठरू शकतो. तपासणी यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह लागल्याने कोरोना विषयी आणखी भीती वाढली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याDhuleधुळे