विनय प्राथमिक शाळेत क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:24 IST2020-01-11T23:27:52+5:302020-01-12T01:24:00+5:30

विनय मंदिर प्राथमिक शाळेत क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष आशाताई खरे, तर प्रमुख अतिथी म्हणून स्मिता साखला, सेक्रेटरी निता पहाडे, संस्थेचे सरचिटणीस अमित खरे, शालेय समितीचे चेअरमन आर.पी.तापडे, नवभारत माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक पौर्णिमा खरे उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक मुख्याध्यापक धनंजय पाटील यांनी केले.

Vinay Elementary School begins sports events | विनय प्राथमिक शाळेत क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

विनय मंदिर प्राथमिक शाळेत क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी आशाताई खरे, आर.पी. तापडे, स्मिता साखला, निता पहाडे, अमित खरे आदी.

ठळक मुद्देमालेगाव। विद्यार्थ्यांनी घेतला विविध स्पर्धांमध्ये सहभाग

मालेगाव : विनय मंदिर प्राथमिक शाळेत क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष आशाताई खरे, तर प्रमुख अतिथी म्हणून स्मिता साखला, सेक्रेटरी निता पहाडे, संस्थेचे सरचिटणीस अमित खरे, शालेय समितीचे चेअरमन आर.पी.तापडे, नवभारत माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक पौर्णिमा खरे उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक मुख्याध्यापक धनंजय पाटील यांनी केले. क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन अध्यक्ष प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. स्मिता साखला यांनी मनोगत व्यक्त केले. चेअरमन तापडे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात खेळाचे महत्त्व समजून दिले. याप्रसंगी माता-पालक, शिक्षिका, शिक्षक यांची संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. यात ५० माता पालकांनी सहभाग घेतला. श्रीमती पौर्णिमा पाटील, श्रीमती सुवर्णा बच्छाव व सुरेश शिंदे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन यशवंत देवरे तर आभार प्रशांत ठाकरे यांनी मानले.

Web Title: Vinay Elementary School begins sports events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.