विमलकाकू मोगल यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 17:53 IST2020-01-15T17:51:32+5:302020-01-15T17:53:28+5:30
कसबे-सुकेणे : निफाड तालुक्याचे माजी आमदार कै. मालोजीराव मोगल यांच्या पत्नी गं. भा. विमलकाकू मालोजीराव मोगल (९०) यांचे बुधवारी दुपारी पिंपळगाव बसवंत येथे एका खासगी रूग्णालयात उपचार घेत असतांना निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी उशीरा मौजे सुकेणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

विमलकाकू मोगल यांचे निधन
निफाडच्या राजकारणात तब्बल चार दशके दबदबा निर्माण करणारे माजी आमदार मालोजीराव मोगल यांच्या राजकीय प्रवासात विमलकाकूंचा मोलाचा वाटा होता. कार्यकर्त्यांमध्ये व तालुक्यात त्या काकू म्हणून परिचित होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र मोगल व पंचायत समितीचे माजी सदस्य सर्जेराव मोगल यांच्या त्या मातोश्री होत.