गिरणा नदीपात्रात गावठी दारूभट्टीवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 18:17 IST2019-03-28T18:11:11+5:302019-03-28T18:17:01+5:30

देवळा : लोहोणेर शिवारातील गिरणा नदीपात्रात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर नाशिक स्थानिक गुन्हे शाखा पथकाने छापा टाकून ३९ हजार ५०० रूपयांचे साहीत्य जप्त केले.

The villager rides on the river bedbutter | गिरणा नदीपात्रात गावठी दारूभट्टीवर छापा

गिरणा नदीपात्रात गावठी दारूभट्टीवर छापा

ठळक मुद्देया प्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला

देवळा : लोहोणेर शिवारातील गिरणा नदीपात्रात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर नाशिक स्थानिक गुन्हे शाखा पथकाने छापा टाकून ३९ हजार ५०० रूपयांचे साहीत्य जप्त केले.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार लोहोणेर शिवारातील गिरणा नदीपात्रात लखन शिवराम सोनवणे (रा.लोहोणेर, ता. देवळा) हा इसम विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू तयार करतो. याची नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस हवालदार ए. एस. जगताप, एस. पी. घुगे, भगवान निकम आदींच्या पथकाने सापळा रचून गुरु वारी (दि.२८) सकाळी साडेसहा वाजता गिरणा नदीपात्रात छापा टाकून विनापरवाना गैरकायदा गावठी हातभट्टीची ३० लिटर तयार गावठी दारू, रसायने, व दारू बनविण्याचे साहीत्य असे एकूण ३९ हजार ५०० रु पये किंमतीचे साहित्य जप्त करु न ते नष्ट करण्यात आले. या प्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
 

 

Web Title: The villager rides on the river bedbutter