राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत विक्रांत मेहता उपविजेता
By Admin | Updated: May 14, 2014 22:34 IST2014-05-14T18:12:49+5:302014-05-14T22:34:58+5:30
राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत विक्रांत मेहता उपविजेता

राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत विक्रांत मेहता उपविजेता
राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत विक्रांत मेहता उपविजेता
नाशिक : पुणे येथे संपन्न झालेल्या १४ वर्षांतील मुलांच्या राष्ट्रीय मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत येथील विक्रांत प्राजक्त मेहता याने उपविजेतेपद मिळविले. यामुळे विक्रांतला राष्ट्रीयस्तरावरील २० गुण मिळाले आहेत. त्याने अभिजित मांगले, प्रसन्ना बागडे, प्रणीत कुदळे यांना नमवून अंतिम फेरी गाठली.अंतिम फेरीत गुजरातच्या मादविन कामतकडून ३-६,३-६ असा पराभव स्वीकारून त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. नाशिक जिमखान्यात प्रशिक्षक राकेश पाटील यांच्याकडे तो नियमित सराव करतो. विक्रांत आणखी एक वर्ष १४ वर्षांतील स्पर्धेत खेळू शकतो. पुढील वर्षी तो या स्पर्धेचे विजेतेपद मिळवू शकतो असे मत त्याचे प्रशिक्षक राकेश पाटील यांनी व्यक्तकेले.