शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘हेल्मेट’तपासणीसाठी सतर्कता अन‌् वाहतूककोंडीबाबत उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:35 IST

शहरातील बहुतांश ठिकाणी विविध कारणांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतोे. मात्र, याकडे शहर वाहतूक पोलिसांकडून कानाडोळा केला जातो. दररोज वडाळा रोडवरून ...

शहरातील बहुतांश ठिकाणी विविध कारणांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतोे. मात्र, याकडे शहर वाहतूक पोलिसांकडून कानाडोळा केला जातो. दररोज वडाळा रोडवरून वाहतूक करताना विविध अडथळ्यांचा सामना करावा लागतो. रस्त्यांवरील अतिक्रमण, तसेच लॉन्सचालकांकडे असलेल्या लग्नसोहळे आणि रस्त्यावर उभी राहणारी वाहने ही समस्या दिवसेंदिवस वडाळा रोडवर सिग्नलपासून थेट पांडवनगरीपर्यंत गंभीर बनत चालली आहे.

सीबीएस सिग्नल ते कॅनडा कॉर्नरपर्यंत टिळकवाडी-शरणपूर रोड रस्ता ‘नो पार्किंग-नो हॉल्टिंग झोन’ म्हणून घोषित केला आहे. मात्र, तो केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसून येते.

मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या शेजारी वाहतुकीला नेहमीच अडथळा निर्माण होतो. सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत कूल कॅब टॅक्सी थांब्याच्या वळणापासून मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या शहर बस निवारा शेडपर्यंत वाहतूककोंडी होते.

--इन्फो--

‘वाइन’ची नशा अन‌् वाहतुकीचा बोजवारा

मुंबई नाका येथील वाइनच्या दुकानात पॉश कारमधून मद्य खरेदीसाठी येणारी मंडळी सर्रासपणे रस्त्यांवर त्यांची वाहने उभी करतात. वाइनची हौस भागविण्यासाठी ग्राहकांच्या रीघमध्ये प्रदीर्घ वेळ उभे राहून मद्य खरेदी करतात. मात्र, तोपर्यंत वाहतुकीचा रस्त्यावर बोजवारा उडालेला असतो. हा सर्व प्रकार मुंबई नाका पोलीस ठाण्याशेजारी घडत नित्यनेमाने घडत आहे. याकडे ‘खाकी’ किंवा ‘पांढऱ्या’ वर्दीतील कोणतेही पोलीस लक्ष देत नसल्याने सर्वसामान्य नाशिककरांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

---कोट--

शहरात दुचाकीवरून ट्रीपल सीट प्रवास, मोबाइलवर बोलणे, विरुद्ध बाजूने जाणे, नो-एण्ट्रीमध्ये घुसखोरी आणि रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांची हेल्मेट तपासणी या प्रकारे कारवाईचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले आहेत. महामार्गावर ओव्हरस्पीड, सीटबेल्ट, हेल्मेट तपासणी मात्र नियमितपणे करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वेळोवेळी सूचना बिनतारी संदेश यंत्रणेवरून दिल्या जातात.

- पौर्णिमा चौगुले-श्रींगी, उपायुक्त शहर वाहतूक शाखा