शहरं
Join us  
Trending Stories
1
नौदल एक-दोन नव्हे तर १९ युद्धनौका सामील करणार; चीनच्या आव्हानाला भारताचे उत्तर
2
अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
3
नवीन वर्षात कोणती बँक देतेय स्वस्त दरात कार लोन: ७.४०% व्याजासह १० लाखांच्या कर्जावर किती असेल EMI?
4
"बायकोने बॉयफ्रेंडशी लग्न केलं, मुलंही झालं, दागिने-पैसे घेऊन फरार..."; न्यायासाठी नवऱ्याचं उपोषण
5
भारतात रस्त्याच्या डाव्या बाजूनेच गाडी का चालवली जाते? रंजक इतिहास, अन्य कोणते देश असेच नियम पाळतात...
6
ट्रम्प यांच्यासाठी नोबेलचा त्याग, पण बदल्यात काय मिळालं? व्हेनेझुएलाच्या 'त्या' महिला नेत्याला मोठा झटका!
7
शुभमंगल सावधान! अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाची तारीख ठरली; सानिया चंडोकशी बांधणार लगीनगाठ
8
"पंतप्रधान मोदी माझ्यावर नाराज..."; ट्रम्प यांना चुकीची जाणीव! भारतासोबतच्या संबंधांवर काय म्हणाले?
9
विमा एजंटच्या अधिक कमिशनला चाप लावण्याची तयारी, कंपन्यांनी एका वर्षात वाटले ६०,८०० कोटी रुपये
10
गॅस चेंबर अन् भीषण स्फोट! DMRC इंजिनिअरचं कुटुंब झोपेतच संपलं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
11
Numerology: तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यात कोणत्या 'हेतूने' आला? याचे गुपित जन्मतारखेवरुन कळणार!
12
अवघ्या ५ हजार रुपयांत उभं केलं १३ हजार कोटींचं साम्राज्य! देशातील प्रत्येक घरात होतो वापर
13
सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
14
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
15
६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
16
शेअर बाजारात पुन्हा घसरण, Sensex १९७ अंकांची, तर निफ्टीमध्ये ५९ अंकांची घसरण; हे स्टॉक्स आपटले
17
अकोला हादरले! काकाच्या हत्येचा भीषण बदला; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मशिदीबाहेर हत्या; आरोपीला बेड्या
18
Post Office ची जबरदस्त स्कीम, व्हाल मालामाल; वाचवा केवळ ४०० रुपये; मिळेल २० लाख रुपयांचा निधी
19
पत्नी, सासरे ते कर्मचारी... रोहित पवारांनी MCA मध्ये पेरले हक्काचे मतदार; केदार जाधवचा गंभीर आरोप
20
१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
Daily Top 2Weekly Top 5

Video: अर्धनग्न तरुणाचं पवारांना निवेदन, सरकारवर दडपशाहीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 17:10 IST

निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडली. या सभेमध्ये एक तरुण चक्क अर्धनग्न होऊन व्यासपीठावर आला आणि शरद पवारांना निवेदन दिलं.

नाशिक - दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाले यांच्या प्रचारासाठी निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडली. या सभेमध्ये एक तरुण चक्क अर्धनग्न होऊन व्यासपीठावर आला आणि शरद पवारांना निवेदन दिलं. काही दिवसांपूर्वी जमिनीच्या प्रश्नावर तरुणाने आंदोलन केलं होतं मात्र या तरुणाचं आंदोलन भाजपा सरकारकडून मोडीत काढण्याचा प्रयत्न केला गेला. सरकारने दडपशाही केल्याचा आरोप तरुणाने केला. 

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आले, कांद्याबाबत काय बोलले नाहीत. शेतकऱ्यांबाबत काय उल्लेख केला नाही. कारण शेतकऱ्यांना न्याय देण्याची या नेतृत्वाची ती भूमिका नाही असा आरोप त्यांनी सभेत केला. सरकारच्या धोरणांना विरोध करणाऱ्या त्या तरुणाचं नाव कृष्णा डोंगरे असं आहे. हे सरकार बदलणार नाही तोपर्यंट शर्ट घालणार नाही अशी भूमिका या तरुणाने घेतली आहे. डोंगरे यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन शरद पवारांना दिलं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या तरुणाला आधार देत घाबरू नको, आपल्या मागण्या लवकरच मान्य होतील, 26 मे नंतर मी आपल्याला शर्ट पाठवून देईल असं आश्वासन दिलं. 

नरेंद्र मोदी सभा घेण्यापूर्वी तेथील शेतकऱ्यांना अटक करतात आणि मगच त्याठिकाणी पाऊल ठेवतात, शेतकऱ्यांना इतके घाबरणारा पंतप्रधान देश प्रथमच पाहतोय. आमच्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने शरद पवारांसमोर जी कैफियत मांडली. या भाजपा सरकारला हद्दपार केल्याशिवाय जनता शांत बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला दिला. 

आगामी लोकसभा निवडणुकीत सात टप्प्यात मतदान होत असून तीन टप्प्यातलं मतदान पूर्ण झालं आहे. महाराष्ट्रात एकूण 4 टप्प्यात मतदान पार पडतंय. यामध्ये तीन टप्प्यातील मतदान पार पडलं असून अंतिम चौथा टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी होणार आहे. तर 23 मे रोजी लोकसभा निवडणुकींचा निकाल लागणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाnifadनिफाडdindori-pcदिंडोरीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019