जिल्ह्यातील बळींनी ओलांडला ७ हजारांचा टप्पा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 01:12 IST2021-06-17T01:10:01+5:302021-06-17T01:12:10+5:30
कोरोना बळींची नोंद पोर्टलवर अपडेट करण्याचे काम बुधवारीही (दि. १४) सुरुच राहिल्याने, दिवसभरात एकूण २६७ बळींची नोंद झाली आहे. त्यात नाशिक मनपा क्षेत्रातील १६६ तर नाशिक ग्रामीणमधील ७३ आणि मालेगाव मनपा क्षेत्रातील एका बळीचा त्यात समावेश आहे. पोर्टलवरील या २६७ बळींमुळे आतापर्यंत एकूण ७ हजार १३२ बळींची नोंद झाली आहे. दरम्यान, बुधवारच्या एका दिवसात एकूण ४ नागरिकांचा बळी गेला असून त्यात नाशिक ग्रामीणचे ३ तर मनपा क्षेत्रातील एका बळीचा समावेश आहे.

जिल्ह्यातील बळींनी ओलांडला ७ हजारांचा टप्पा !
नाशिक : कोरोना बळींची नोंद पोर्टलवर अपडेट करण्याचे काम बुधवारीही (दि. १४) सुरुच राहिल्याने, दिवसभरात एकूण २६७ बळींची नोंद झाली आहे. त्यात नाशिक मनपा क्षेत्रातील १६६ तर नाशिक ग्रामीणमधील ७३ आणि मालेगाव मनपा क्षेत्रातील एका बळीचा त्यात समावेश आहे. पोर्टलवरील या २६७ बळींमुळे आतापर्यंत एकूण ७ हजार १३२ बळींची नोंद झाली आहे. दरम्यान, बुधवारच्या एका दिवसात एकूण ४ नागरिकांचा बळी गेला असून त्यात नाशिक ग्रामीणचे ३ तर मनपा क्षेत्रातील एका बळीचा समावेश आहे.
पालकमंत्र्यांनी शनिवारी दोन दिवसात पोर्टलवरील बळींची नोंद पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. तरी प्रत्यक्ष बळी आणि पोर्टलवरील बळींच्या संख्येत दिसणारी तफावत भरून काढण्यासाठी गुरुवारपासून सुरु असलेली पोर्टलवर बळींची संख्या अपडेट करण्याचे काम बुधवारीदेखील सुरुच होते. पोर्टलवर अपडेट करण्याच्या नावाखाली ६ दिवसात तब्बल २ हजारांवर बळींची नोंद झाली आहे.
इन्फो
पोर्टलवरील बळींची नोंद २ हजारांवर
आतापर्यंत गुरुवारी तब्बल २७०, शुक्रवारी २१४, शनिवारी ३३३, रविवारी ५१०, सोमवारी १५१,मंगळवारी २८४ तर बुधवारी २६७ अशा प्रकारे एकूण २०२९ बळींची नोंद करण्यात आली आहे. अद्यापही काही प्रमाणात ही बळीसंख्या वाढत राहणार असल्याचेच संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत नोंद न झालेल्या बळींचा हा आकडा नक्की कुठंपर्यंत जाणार, त्याच्याच चर्चेला बहर आला आहे.
इन्फो
नवीन २१६, कोरोनामुक्त १४२
जिल्ह्यात बुधवारी एकूण रुग्णसंख्येत २१६ ने वाढ झाली, तर २९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन कोरोनाबाधितांमध्ये ७३ रुग्ण नाशिक ग्रामीणचे, १३३ रुग्ण नाशिक मनपाचे, मालेगाव मनपाचे ४, तर ६ जिल्हाबाह्य क्षेत्रातील आहेत. नवीन बाधितांमध्ये पुन्हा ग्रामीणची संख्या शहराच्या तुलनेत दुप्पट आली आहे.