अनधिकृत स्पीड ब्रेकरने घेतला कामगाराचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 15:18 IST2018-11-03T15:18:36+5:302018-11-03T15:18:47+5:30
रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुका देवी मंदिरामागे राहणारे प्रेस कामगार सतीश दत्तात्रय बेलेकर (५७) हे गुरुवारी रात्री भगूर गावात खासगी कामानिमित्त आले होते. काम आटोपून रात्री १०.३० ते ११ वाचेच्या दरम्यान आपली दुचाकी (एमएच १५ इएफ ४२१७)वरून घरी जात

अनधिकृत स्पीड ब्रेकरने घेतला कामगाराचा बळी
भगूर : येथील मारवाडी गल्लीतील गतिरोधकावरून गुरुवारी रात्री पडून गंभीर जखमी झालेल्या प्रेस कामगाराचा रविवारी सायंकाळी खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या गतिरोधकाने एका नागरिकांचा बळी घेतल्याने जनमानसात संतापाची लाट उसळली आहे.
रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुका देवी मंदिरामागे राहणारे प्रेस कामगार सतीश दत्तात्रय बेलेकर (५७) हे गुरुवारी रात्री भगूर गावात खासगी कामानिमित्त आले होते. काम आटोपून रात्री १०.३० ते ११ वाचेच्या दरम्यान आपली दुचाकी (एमएच १५ इएफ ४२१७)वरून घरी जात असताना मारवाडी गल्लीतील सुराणा यांच्या घरासमोरील काँक्रीट रोडवर बेकायदेशीरपणे उभारलेल्या मोठ्या गतिरोधकाचा अंदाज न आल्याने सतीश बेलेकर यांचे वाहन आदळून खाली पडले. या अपघातात त्यांच्या मेंदूस मार बसल्याने ते रक्तस्राव होऊन गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी सतीश बेलेकर यांची प्राणज्योत मालवली. गृहरक्षक दलातही सेवा बजावणाऱ्या बेलेकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा-मुलगी असा परिवार आहे. या अपघाती मृत्यूप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान, पालिकेने रस्ते काँक्रीटीकरण केल्यानंतर काही नागरिकांनी आपापल्या गरजेनुसार वाहनांच्या वेगाला आवर घालण्यासाठी उंचच उंच गतिरोधक जागोजागी उभारले. त्याबाबत सूचना देणारे फलक, तसेच गतिरोधकाला काळेपांढरे पट्टे नसल्याने रात्रीच्या अंधारात त्यांचा अंदाज नवोदित वाहनधारकांना येत नसल्याने तेथे वारंवार छोटे-मोठे अपघात होतात. आता हे गतिरोधक नागरिकांच्या जिवावर बेतू लागल्याने वाहनधारक धास्तावले आहेत. पालिकेने याची दखल घेऊन गावातील असे बेकायदेशीर गतिरोधक तत्काळ हटवावे आणि गतिरोधक उभारणाºयावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त गावकºयांनी केली आहे.