पोलिसांचा पाठलाग बेतला तरुणाच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:28 IST2018-11-03T23:23:17+5:302018-11-03T23:28:00+5:30

नाशिक : दुचाकीवरून ट्रिपलसीट जाणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर दुचाकी भरधाव घेऊन जाताना भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली.

The victim of the police beat the teenager | पोलिसांचा पाठलाग बेतला तरुणाच्या जिवावर

पोलिसांचा पाठलाग बेतला तरुणाच्या जिवावर

ठळक मुद्देदोन जखमी : भरधाव दुचाकी भिंतीवर आदळली

नाशिक : दुचाकीवरून ट्रिपलसीट जाणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर दुचाकी भरधाव घेऊन जाताना भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली.
गंगापूररोड भागात पाइपलाइन परिसरातून सकाळी ११ वाजेच्या सुमारास तरुण दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना पोलिसांनी
त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा पाठलाग टाळण्यासाठी तरुणांनी वेग वाढविल्याने दुचाकी काळेनगर जॉगिंग ट्रॅकच्या सुरक्षा भिंतीवर आदळल्याने तबरेज खान (१७)याचा मृत्यू झाला. तर नितीन जैस्वाल आणि सलमान सोहेलअली खान हे दोनजण जखमी झाले आहेत. पोलिसांवर आरोप घटनेची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी मृत व जखमी युवकांच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत या घटनेस पोलीस जबाबदार असल्याचा आरोप करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काहीकाळ तणावाचे वातारण निर्माण झाल्याने याठिकाणी सरकारवाडा पोलिसांसह शीघ्रकृती दलाचे जवानही तैनात करण्यात आले होते.

Web Title: The victim of the police beat the teenager