जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 08:29 IST2021-05-05T08:29:31+5:302021-05-05T08:29:46+5:30
अभ्यासिकेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो मुलांचं करिअर घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर यांचे निधन
नाशिक- जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते वसंतराव हुदलीकर यांचे आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास निधन झाले.
स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणाऱ्या वसंतराव हे अखेर पर्यंत सामाजिक कार्यात सक्रिय होते. सीबीएस जवळील हुतात्मा स्मारक हे त्यांच्यामुळेच पुरोगामी चळवळीचे केंद्र बनले होते. येथील अभ्यासिकेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो मुलांचं करिअर घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.