सटाणा येथील विक्रेते होणार ‘आत्मनिर्भर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:07 IST2020-07-10T20:17:16+5:302020-07-11T00:07:30+5:30

सटाणा : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लॉकडाऊन काळातही कामांचा निपटारा करण्यासाठी येथील पालिकेने शुक्रवारी(दि.१०) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आॅनलाईन सर्वसाधारण सभा घेऊन शहर विकासाशी संबंधित महत्वपूर्ण विषयांना मंजुरी दिली. व्हिसीद्वारे स्थायी समितीची बैठक पार पाडणारी ही जिल्ह्णातील पहिलीच पालिका असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

Vendors in Satana to be 'self-reliant' | सटाणा येथील विक्रेते होणार ‘आत्मनिर्भर’

सटाणा येथील विक्रेते होणार ‘आत्मनिर्भर’

सटाणा : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लॉकडाऊन काळातही कामांचा निपटारा करण्यासाठी येथील पालिकेने शुक्रवारी(दि.१०)
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आॅनलाईन सर्वसाधारण सभा घेऊन शहर विकासाशी संबंधित महत्वपूर्ण विषयांना मंजुरी दिली. व्हिसीद्वारे स्थायी समितीची बैठक पार पाडणारी ही जिल्ह्णातील पहिलीच पालिका असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
या बैठकीत पालिका क्षेत्रात अंगणवाड्यांसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यास मान्यता देण्यात आली.राज्य फेरीवाला धोरणांतर्गत पालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांसाठी कर्ज योजना मंजूर व्हावे, याबाबत बँकांना विनंती करण्याबाबतचा ठरावही सर्वानुमते करण्यात आला. या योजनेमुळे केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथक विक्रेता आत्मनिर्भर योजनेअंतर्गत १० हजार रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल कर्ज स्वरुपात उपलब्ध करून दिले जाणार आहे.
नगर परिषद क्षेत्रातील ८१८ पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण यापूर्वीच करण्यात आले आहे. या ठरावामुळे सर्व लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
या सभेत नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासह शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती राहुल पाटील,भाजप गटनेते,नियोजन व विकास सभापती महेश देवरे,पाणीपुरवठा समिती सभापती संगीता देवरे,आरोग्य सभापती दीपक पाकळे,महिला व बालकल्याण सभापती शमा मन्सुरी,मुख्याधिकारी हेमलता डगळे,कार्यालयीन अधीक्षक माणिक वानखेडे,बांधकाम अभियंता चेतन विसपुते, पाणीपुरवठा अभियंता राकेश पावरा,सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय भोई आदींनी सहभाग घेतला होता.
योगा केंद्र, बांधकामाच्या निविदांना मंजुरी
पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना पक्षघात झाल्याने त्यांच्या कामकाजात बदल करण्याच्या प्रस्तावासही यावेळी सहानुभूतीपूर्वक विचार करून मंजुरी देण्यात आली. शहरातील सर्वे नंबर १०३ मधील खुल्या जागेतील योगा केंद्राचे बांधकाम व प्रभाग क्रमांक आठमधील बहुउद्देशीय बांधकामाच्या निविदाही यावेळी मंजूर करण्यात आल्या.
------------------
सभेत मंजूर झालेल्या विविध विषयांमुळे शहर विकासाचा वेग कायम राहील. लॉकडाऊन असतानाही पालिकेच्या विविध महत्वाकांक्षी योजनेची कामे युद्धपातळीवर सुरू राहिली आहेत.
- सुनील मोरे, नगराध्यक्ष

Web Title: Vendors in Satana to be 'self-reliant'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक