वेळुंजेला भात लावणीस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:23 IST2020-06-19T21:30:39+5:302020-06-20T00:23:46+5:30

त्र्यंबकेश्वर तालुक्यात मान्सूनला वेळेत सुरुवात झाल्याने व भातलावणीच्या रोपांना समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील वेळुंजे येथे भातलावणीस सुरुवात झाली आहे.

Velunjela rice planting begins | वेळुंजेला भात लावणीस सुरुवात

वेळुंजे येथे भात लावणी करताना मजूर.

ठळक मुद्देसमाधान : ग्रामीण भागात रोजगाराला मिळाली चालना

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यात मान्सूनला वेळेत सुरुवात झाल्याने व भातलावणीच्या रोपांना समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील वेळुंजे येथे भातलावणीस सुरुवात झाली आहे.
गेल्या तीन-साडेतीन महिन्यांपासून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होत नसल्याने मजूरवर्गाची चांगली तारांबळ उडत होती. आता भात लावणीस सुरुवात झाल्याने हाताला काम मिळाल्याने मजूरवर्ग समाधान व्यक्त करीत आहे. कोरोनोच्या महाभयंकर महामारीतून कामधंद्यासाठी शहरात जायला ग्रामीण भागातून मजूरवर्ग तयार होत नव्हता, त्यामुळे मजूर कुटुंबावर मोठे संकट उभे राहिले होते. आता गावातच रोजगार मिळणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्वाधिक भात, नागली, वरईसारखी प्रमुख पिके घेतली जातात. ऐन अवणीच्या वेळी मजूर मिळणे कठीण असते. परिसरात भात लावणीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापुढे किमान दोन महिने भात लावणीतून रोजगार उपलब्ध होणार आहे.

तीन महिन्यांपासून रोजगार नव्हता. पाऊस वेळेत पडल्याने भात लावणीस सुरुवात झाली. त्यामुळे काम मिळू लागल्याने हाती दोन पैसे मिळतील. कोरोनामुळे कुठेच जाता येत नव्हते. कामधंदे सर्व बंद होते. त्यामुळे रोजगार मिळत नव्हता. आता किमान तीन महिने रोजगार मिळणार आहे. त्याचे समाधान आहे.

- दशरथ काशीद, मजूर

Web Title: Velunjela rice planting begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.