भाजीपाला थेट ग्राहकांना विक्र ी करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 00:55 IST2020-09-04T22:32:20+5:302020-09-05T00:55:34+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी बाजारपेठा, आठवडे बाजारदेखील बंद आहेत. शेतकºयांना आपला शेतीमाल विकण्यासाठी अनेक अडचणी येत असल्या तरी काही उत्पादक शेतकºयांनी राष्ट्रीय महामार्ग तसेच छोट्यामोठ्या रस्त्यांवर आपली शेतीमालाची दुकाने थाटून शेतकरी ते ग्राहक असा प्रवास करत चार पैसे मिळवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री करावा, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.

कोकणगाव फाटा येथे थेट भाजीपाला विक्र ी करणाऱ्या शेतकºयाशी संवाद साधतांना कृषिमंत्री दादा भुसे.
कोकणगाव/सायखेडा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी बाजारपेठा, आठवडे बाजारदेखील बंद आहेत. शेतकºयांना आपला शेतीमाल विकण्यासाठी अनेक अडचणी येत असल्या तरी काही उत्पादक शेतकºयांनी राष्ट्रीय महामार्ग तसेच छोट्यामोठ्या रस्त्यांवर आपली शेतीमालाची दुकाने थाटून शेतकरी ते ग्राहक असा प्रवास करत चार पैसे मिळवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री करावा, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.
राष्ट्रीय महामार्ग प्रवास करत असतानाच कोकणगाव फाट्याजवळ अचानक एक वृद्ध शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी दुकान थाटून बसलेला त्यांना पाहायला मिळाला. आपली गाडी थांबवत त्यांनी थेट शेतीमाल विक्र ी करणारे लक्ष्मण मोरे यांच्याशी संवाद साधला. शेतकरी ते ग्राहक असा शेतकºयांचा कोरोनाकाळात सुरू असलेला प्रवासावर चर्चा करून समाधान व्यक्त केले.