शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

वडनेरभैरव उपबाजारात भाजीपाला लिलावास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 6:19 PM

चांदवड : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार असलेल्या वडनेरभैरव परिसरातील शेतकरी व व्यापारी बांधवांच्या मागणीनुसार वडनेरभैरव येथे संचालक संपतराव वक्ते यांच्या हस्ते भाजीपाला लिलावाचा शुभारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देपहिल्याच दिवशी भाजीपाला शेतीमालाची ३०० कॅरेटची आवक झाली.

चांदवड : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार असलेल्या वडनेरभैरव परिसरातील शेतकरी व व्यापारी बांधवांच्या मागणीनुसार वडनेरभैरव येथे संचालक संपतराव वक्ते यांच्या हस्ते भाजीपाला लिलावाचा शुभारंभ करण्यात आला.पहिल्याच दिवशी भाजीपाला शेतीमालाची ३०० कॅरेटची आवक झाली. यावेळी काकडी प्रति कॅरेट ३०० ते ४००, भोपळे १५० ते २०० रुपये, शिमला मिरची२०० ते २५० रुपये व मिरची प्रति किलो २५ ते ३० रुपये याप्रमाणे बाजारभाव मिळाले. यावेळी बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे, शेतकरी सुभाष पोपट माळी, अमोल तिडके, सचिन तिडके, दत्तात्रेय ढोमसे, सुनील शेठे, व्यापारी सुनील जगताप, बाबूराव मोरे, गोकूळ निकम, नाझीम भाई व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपबाजार आवार, वडनेरभैरव येथे मागील २ ते ३ वर्षांपासून हंगामी भाजीपाला शेतीमालाचे लिलाव सुरू केलेले असून या ठिकाणी समाधानकारक व्यवहार झालेले आहेत. उपबाजार आवारावर विक्री होणाऱ्या शेतीमाल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात अदा केली जात असल्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला भाजीपाला शेतीमाल प्रतवारी करुन वडनेरभैरव येथे विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, सर्व संचालक मंडळ, भाजीपाला व्यापारी व सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी केले आहे. 

टॅग्स :market yardमार्केट यार्डFarmerशेतकरी