शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

वीरपत्नी यशोदा यांची उत्तुंग भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 01:54 IST

नाशिक : सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील वीरपत्नी यशोदा केशव गोसावी यांनी आपल्या हुतात्मा पतीचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द बाळगून बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. पदवीधर होऊन भारतीय सेनेत अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

नाशिक : सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील वीरपत्नी यशोदा केशव गोसावी यांनी आपल्या हुतात्मा पतीचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द बाळगून बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. पदवीधर होऊन भारतीय सेनेत अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न आहे.जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये भारत-पाक सीमेवर झालेल्या गोळीबारात भारतीय सेनेचे नायक केशव गोसावी २०१८ साली नोव्हेंबर महिन्यात हुतात्मा झाले. त्यानंतर अवघ्या आठवडाभरातच यशोदा यांना कन्यारत्न प्राप्त झाले. पतीच्या निधनाच्या धक्क्यातून त्यांनी स्वत:ला सावरत आपल्या तान्हुल्या ‘काव्या’चा सांभाळ करण्यावर लक्ष केंद्रित केले. मुलगी लहान असल्यामुळे त्यांना त्यावेळी शिक्षणाकडे वळता आले नाही; मात्र मागील वर्षी त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पाथरी येथील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आपल्या माहेरी बारावीला ‘एक्स्टर्नल’ म्हणून प्रवेश घेतला.घरी सासरे एकटेच असल्याने व काव्या लहान असल्यामुळे नियमतिपणे महाविद्यालयात जाणे शक्य नसल्याचे त्यांनी तेथील प्राचार्यांना पटवून दिले. आई, वडील, सासरे व शिक्षक वर्गाची त्यांना चांगली साथ व पाठिंबा लाभला. यामुळेच बारावीची परीक्षा ७५ टक्के गुणांनी उत्तीर्ण करता आली, असे यशोदा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.------------केवळ रात्रीचे दोन तास अभ्यासवीरपत्नी यशोदा यांनी बारावीला कला शाखेतून प्रवेश घेतला. बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते; मात्र त्यांची भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची जिद्द व हुतात्मा केशव यांचे स्वप्न पूर्ण करण्याची बांधलेली खुणगाठ यामुळे केवळ दररोज रात्री ८ ते १० असा दोन तास घरी अभ्यास करून त्यांनी ७५ टक्के गुण मिळविले. आता पुढील शिक्षणासाठी यशोदा गोसावी यांनी जिद्दीने अभ्यास करण्याचे ठरविले असून, आपल्या मुलीलाही चांगल्या प्रकारचे शिक्षण आणि संस्कार देऊन मोठे करण्याचे ठरविले आहे.------------आयटीआयचा पदविका अभ्यासक्र म लग्नानंतरच पूर्ण केला; मात्र कालांतराने शिक्षण मागे पडले. पती शहीद झाल्यानंतर मीसुद्धा भारतीय सेनेत भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बारावीची परीक्षा उत्तीर्ण करून पुढे पदवीचा मार्ग मोकळा करणे गरजेचे होते. म्हणून दोन तास मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आणि परीक्षा उत्तीर्ण केली.- यशोदा केशव गोसावी, वीरपत्नी

टॅग्स :Nashikनाशिक