शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

वावीत व्यावसायिकांची होणार दोनदा तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 9:49 PM

सिन्नर : तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या वावी गावात व्यवसाय करणाºया सर्वच व्यावसायिकांची आठवड्यातून दोन वेळा तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार आठवडे बाजारचे निमित्त साधून आरोग्य केंद्राच्या वतीने गावातील दुकानांमध्ये जाऊन व्यावसायिकांची इन्फ्रारेड थर्मामीटरद्वारे तपासणी करण्यात आली. पेठेचे गाव असल्याने वावी गावात बाहेरून खरेदीसाठी येणाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते. याठिकाणी विविध सेवा पुरवणारे व्यावसायिक असून, त्यांच्या संपर्कात अनेक व्यक्ती दररोज येत असतात. परिसरातील १५ ते २० गावातील रहिवासी खरेदीच्या निमित्ताने वावीशी जोडले गेले आहेत. शेजारच्या कहांडळवाडी गावात एका २१ वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यावर आरोग्य विभागाकडून वावी गावातील व्यावसायिकांची वेळोवेळी तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देआपत्कालीन परिस्थितीत डेटाबेस तयार होणार असल्याचे आरोग्यसेवक तमनर यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या वावी गावात व्यवसाय करणाºया सर्वच व्यावसायिकांची आठवड्यातून दोन वेळा तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार आठवडे बाजारचे निमित्त साधून आरोग्य केंद्राच्या वतीने गावातील दुकानांमध्ये जाऊन व्यावसायिकांची इन्फ्रारेड थर्मामीटरद्वारे तपासणी करण्यात आली.पेठेचे गाव असल्याने वावी गावात बाहेरून खरेदीसाठी येणाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते. याठिकाणी विविध सेवा पुरवणारे व्यावसायिक असून, त्यांच्या संपर्कात अनेक व्यक्ती दररोज येत असतात. परिसरातील १५ ते २० गावातील रहिवासी खरेदीच्या निमित्ताने वावीशी जोडले गेले आहेत. शेजारच्या कहांडळवाडी गावात एका २१ वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यावर आरोग्य विभागाकडून वावी गावातील व्यावसायिकांची वेळोवेळी तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, वैद्यकीय अधिकारी अजिंक्य वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गावात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. व्यावसायिकांनी दुकानात पूर्णवेळ मास्कचा वापर करावा. ग्राहकांशी सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करावेत. सॅनिटायझरचा वारंवार वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विनामास्क खरेदीसाठी येणाºया ग्राहकांना कोणतीही वस्तू विकत देऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.त्यामुळे ग्राहकांमध्ये देखील जबाबदारीची जाणीव होईल व ते घराबाहेर पडताना मास्कचा वापर करतील असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने व्यवसायिकांना करण्यात आले आहे. आरोग्यसेवक प्रकाश तमनर यांनी आशासेविकांना मदतीला घेत गावातील सर्व व्यावसायिकांची थर्मामीटरच्या साहाय्याने तपासणी केली. दुकानात ग्राहकांच्या संपर्कात असणाºया दुकानदार व त्यांच्या सहाय्यकांच्या शरीराचे तापमान यावेळी तपासण्यात आले. गावात यापुढे आठवड्यातून दोन वेळेस व्यावसायिकांची अशा पद्धतीने तपासणी करण्यात येणार असून, यातून आपत्कालीन परिस्थितीत डेटाबेस तयार होणार असल्याचे आरोग्यसेवक तमनर यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल