वावीत व्यावसायिकांची होणार दोनदा तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 22:59 IST2020-07-02T21:49:05+5:302020-07-02T22:59:45+5:30

सिन्नर : तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या वावी गावात व्यवसाय करणाºया सर्वच व्यावसायिकांची आठवड्यातून दोन वेळा तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार आठवडे बाजारचे निमित्त साधून आरोग्य केंद्राच्या वतीने गावातील दुकानांमध्ये जाऊन व्यावसायिकांची इन्फ्रारेड थर्मामीटरद्वारे तपासणी करण्यात आली. पेठेचे गाव असल्याने वावी गावात बाहेरून खरेदीसाठी येणाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते. याठिकाणी विविध सेवा पुरवणारे व्यावसायिक असून, त्यांच्या संपर्कात अनेक व्यक्ती दररोज येत असतात. परिसरातील १५ ते २० गावातील रहिवासी खरेदीच्या निमित्ताने वावीशी जोडले गेले आहेत. शेजारच्या कहांडळवाडी गावात एका २१ वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यावर आरोग्य विभागाकडून वावी गावातील व्यावसायिकांची वेळोवेळी तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Vavit professionals will be checked twice | वावीत व्यावसायिकांची होणार दोनदा तपासणी

वावीत व्यावसायिकांची होणार दोनदा तपासणी

ठळक मुद्देआपत्कालीन परिस्थितीत डेटाबेस तयार होणार असल्याचे आरोग्यसेवक तमनर यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या वावी गावात व्यवसाय करणाºया सर्वच व्यावसायिकांची आठवड्यातून दोन वेळा तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार आठवडे बाजारचे निमित्त साधून आरोग्य केंद्राच्या वतीने गावातील दुकानांमध्ये जाऊन व्यावसायिकांची इन्फ्रारेड थर्मामीटरद्वारे तपासणी करण्यात आली.
पेठेचे गाव असल्याने वावी गावात बाहेरून खरेदीसाठी येणाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते. याठिकाणी विविध सेवा पुरवणारे व्यावसायिक असून, त्यांच्या संपर्कात अनेक व्यक्ती दररोज येत असतात. परिसरातील १५ ते २० गावातील रहिवासी खरेदीच्या निमित्ताने वावीशी जोडले गेले आहेत. शेजारच्या कहांडळवाडी गावात एका २१ वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यावर आरोग्य विभागाकडून वावी गावातील व्यावसायिकांची वेळोवेळी तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, वैद्यकीय अधिकारी अजिंक्य वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गावात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. व्यावसायिकांनी दुकानात पूर्णवेळ मास्कचा वापर करावा. ग्राहकांशी सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करावेत. सॅनिटायझरचा वारंवार वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विनामास्क खरेदीसाठी येणाºया ग्राहकांना कोणतीही वस्तू विकत देऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.

त्यामुळे ग्राहकांमध्ये देखील जबाबदारीची जाणीव होईल व ते घराबाहेर पडताना मास्कचा वापर करतील असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने व्यवसायिकांना करण्यात आले आहे. आरोग्यसेवक प्रकाश तमनर यांनी आशासेविकांना मदतीला घेत गावातील सर्व व्यावसायिकांची थर्मामीटरच्या साहाय्याने तपासणी केली. दुकानात ग्राहकांच्या संपर्कात असणाºया दुकानदार व त्यांच्या सहाय्यकांच्या शरीराचे तापमान यावेळी तपासण्यात आले. गावात यापुढे आठवड्यातून दोन वेळेस व्यावसायिकांची अशा पद्धतीने तपासणी करण्यात येणार असून, यातून आपत्कालीन परिस्थितीत डेटाबेस तयार होणार असल्याचे आरोग्यसेवक तमनर यांनी सांगितले.

Web Title: Vavit professionals will be checked twice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.