वावीच्या पोलीस शिपायास लाचलुचपत विभागाकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 17:47 IST2019-04-23T17:47:19+5:302019-04-23T17:47:32+5:30
सिन्नर : वावी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायास लाचेची मागणी करण्याच्या पडताळीत आढळून आल्याने अटक करण्यात आली आहे.

वावीच्या पोलीस शिपायास लाचलुचपत विभागाकडून अटक
सिन्नर : वावी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायास लाचेची मागणी करण्याच्या पडताळीत आढळून आल्याने अटक करण्यात आली आहे.
वावी पोलीस ठाण्यात २६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित पोलीस शिपाई अजित किशोर जगधाने याने ३० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. त्याची संबंधित खात्याकडून पडताळणी करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी संशयित जगधाने यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित जगधाने यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली. अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक डी. टी. धोंडगे करीत आहेत.