Vathoda restricted area in Satana taluka due to bird flu | बर्ड फ्ल्यूमुळे सटाणा तालुक्यात वाठोडा प्रतिबंधित क्षेत्र

बर्ड फ्ल्यूमुळे सटाणा तालुक्यात वाठोडा प्रतिबंधित क्षेत्र

नाशिक - जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील वाठोडा गावात घरगुती पाळीव कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे दिसून आल्याने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी येथील एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्या परिसरात कोणतेही व्यावसायिक पोल्ट्रीफार्म नाहीत. यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तसेच पोल्ट्रीसंदर्भात योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना सर्व पोल्ट्री धारकांना दिल्या असल्याचेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.

नाशिक जिल्ह्यात सुरगाणा, मालेगाव, सिन्नर आणि नाशिक तालुक्यात पक्षी दगावण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, सटाणा तालुक्यातील वाठोडा येथे घरगुती पाळीव कोंबड्याना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे दिसून आले आहे. बर्ड फ्ल्यू टाळण्यासाठी या पूर्वीच बाहेरील जिल्ह्यातील पक्षी आणण्यास पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रतिबंध घातला आहे.

Web Title: Vathoda restricted area in Satana taluka due to bird flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.