वासोळला वीज कर्मचाऱ्यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 00:51 IST2021-03-16T22:56:37+5:302021-03-17T00:51:57+5:30
देवळा : वासोळ येथे थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून, याबाबत सहायक अभियंता दीपक गांगुर्डे यांनी देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

वासोळला वीज कर्मचाऱ्यांना मारहाण
देवळा : वासोळ येथे थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून, याबाबत सहायक अभियंता दीपक गांगुर्डे यांनी देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
सविस्तर वृत्त असे, मंगळवारी (दि.१६) तालुक्यातील वासोळ येथे रामदास सखाराम गवळी यांच्याकडे वीजबिलाची थकीत रक्कम असल्याने वीज वितरण कंपनीचे कर्मचारी गोरख निकम व नितीन पवार हे वसुलीसाठी गेले असता गवळी यांनी बिल भरण्यास नकार दिला. तसेच सदर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. निकम यांनी शिवीगाळ करू नका असे सांगितले असता रामदास गवळी, अनिल गवळी, गोरख गवळी, घरातील इतर महिला व पुरुषांनी निकम यांच्यासह पवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी उपस्थित नागरिकांनी वेळीच मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर हे अधिक तपास करीत आहेत. दिवसेंदिवस वीजबिल वसुली करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.