त्र्यंबकराजाच्या पालखीवर वरुणराजाचा जलाभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 00:50 IST2021-11-19T00:50:32+5:302021-11-19T00:50:53+5:30
कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वच मिरवणुकांवर बंदी असल्याने यावर्षीही कार्तिकी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भगवान त्र्यंबक राजाचा रथ गावात मिरवण्याऐवजी मंदिरासमोर आकर्षकरित्या सजवून उभा करण्यात आला होता होता. यावेळी भाविकांनी रथाचे मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान, त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी वरुणराजाने हजेरी लावत पालखीवर जलाभिषेक केला.

त्र्यंबकराजाच्या पालखीवर वरुणराजाचा जलाभिषेक
त्र्यंबकेश्वर : कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वच मिरवणुकांवर बंदी असल्याने यावर्षीही कार्तिकी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भगवान त्र्यंबक राजाचा रथ गावात मिरवण्याऐवजी मंदिरासमोर आकर्षकरित्या सजवून उभा करण्यात आला होता होता. यावेळी भाविकांनी रथाचे मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान, त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी वरुणराजाने हजेरी लावत पालखीवर जलाभिषेक केला.
दुपारी साडेचारच्या दरम्यान सरदार विंचुरकरांतर्फे पुरोहित रुईकर घराण्याकडून रथाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर रथाला बैल जोडण्यात आले. पुढे चांदीचे मुखवटा असलेली मूर्ती रथात नेहमीचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा असलेल्या मूर्तीची पालखीतुन मिरवणुक काढण्यात आली. मार्गावर आकर्षक रंगीबेरंगी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. पालखी मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते. हाच मुखवटा रथात बसवुन मिरवले जातो पण सलग तीन वर्षांपासुन रथ सज्ज करुन त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर शृंगारुन फक्त उभा केला जात आहे. दरम्यान, देवस्थानात पंचमुखी मुखवट्याची पूजा पुरोहित अग्निहोत्री यांनी केली तर नियमित तिन्ही त्रिकाल पूजा देवाचे पारंपरिक पूजक दशपुत्रे, शुक्ल व तेलंग या घराण्यांनी केली.
इन्फो
आज महादेवीला गाडाभर अन्न
दरम्यान दरवर्षी सकाळी ग्रामदेवता महादेवीला गाडाभर अन्न दिले जाते. पण या वर्षी दोन पौर्णिमा असल्याने त्रिपुरारी पौर्णिमा गुरुवारी (दि.१८) रथोत्सवाने साजरी करण्यात आली तर ग्रामदेवता महादेवीला भातोळी शुक्रवारी (दि.१९) अर्पण करण्यात येईल. यावेळी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.