शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

विविध धार्मिक कार्यक्रम : जुलूस-ए-गौसिया उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 5:55 PM

शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास चौक मंडई येथील जहांगीर मशिदीपासून मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देगौस-ए-आझम हे इस्लामी संस्कृतीमधील महान सुफी वली सामुहिक अन्नदान संध्याकाळी सहा वाजता मिरवणूकीची सांगता

नाशिक :इस्लाम धर्माचे ज्येष्ठ वली सुफी संत हजरत शेख अब्दुल कादिर जिलानी उर्फ गौस-ए-आझम यांच्या स्मृतिदिनानिमित्त जुने नाशिक, वडाळागाव परिसरातून बुधवारी (दि.१९) ‘जुलूस-ए-गौसिया’ची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.

गौस-ए-आझम हे इस्लामी संस्कृतीमधील महान सुफी वली असून त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही त्यांचा स्मृतिदिनानिमित्त शहरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. हा संपूर्ण महिना त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा केला जातो. विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप महिनाभर केले जाते. दरम्यान, शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास चौक मंडई येथील जहांगीर मशिदीपासून मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी खतीब यांनी प्रार्थना करत संपुर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी दुवा मागितली. यावेळी मौलाना महेबुब आलम, मौलाना रहेमतउल्ला मिस्बाही, मौलाना वासिक रजा, मौलाना शमशोद्दीन मिस्बाही, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी, एजाज काझी, एजाज रजा मकरानी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस निरिक्षक मंगलसिंह सुर्यवंशी यांनी उपस्थित धर्मगुरूंचे स्वागत केले. मिरवणूक बागवानपूरा, कथडा, शिवाजी चौक, चव्हाटा, नाईकवाडीपुरा, काजीपुरा, कोकणीपुरा, खडकाळी, शहीद अब्दुल हमीद चौक, पिंजारघाटमार्गे संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास बडी दर्गाच्या प्रारंगणात पोहचली.मिरवणूकीमध्ये दारुल उलूम सादिकुलउलूम, मदरसा गौस-ए-आझमचे विद्यार्थी पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर हिरवे ध्वज, पताका लावून सजावट करण्यात आली होती. तसेच ठिकाठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. खडकाळी परिसरातील सजावट लक्षवेधी ठरली. सहभागी समाजबांधव धार्मिक काव्य पठण करत मिरवणूकीत संचलन करत होते. दरम्यान, मीर मुख्तार हे अग्रभागी राहून गौस-ए-आझम यांच्या जीवनकार्याविषयी माहिती ध्वनिक्षेपकावरुन देत होते. बडी दर्गाच्या आवारात दरुदोसलाम व फातेहा पठण करुन संध्याकाळी सहा वाजता मिरवणूकीची सांगता करण्यात आली.सामुहिक अन्नदानचौक मंडई, बडी दर्गा येथे परिसरातील युवक मित्र मंडळांनी एकत्र येत महाप्रसादाचे आयोजन केले होते. सकाळी शेकडो किलोचे शाकाहारी अन्नदान चौकमंडईत तर संध्याकाळी बडी दर्गाच्या प्रारंगणात करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने दोन्ही ठिकाणी अन्नदानाचा लाभ घेतला.

टॅग्स :Muslimमुस्लीमIslamइस्लामNashikनाशिक