पक्षांसाठी लावली विविध प्रकारची फळ झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 18:53 IST2019-05-14T18:51:59+5:302019-05-14T18:53:51+5:30

ब्राह्मणगाव : एकीकडे सर्वत्र चिमणी व अन्य प्रकारच्या पक्षांची संख्या कमी होत असताना येथील निसर्गप्रेमी पदवीधर शेतकरी प्रकाश अहिरे यांनी आपल्या शेतातील बंगल्याजवळ अनेक प्रकारची फुले, फळ झाडे लावून पक्ष्यांसाठी पाणी व धान्याची व्यवस्था केल्याने त्यांचे शेतात सद्या शेकडोच्या संख्येने चिमणी, कावळे, साळुंकी व अन्य पक्षी दररोज येत आहेत. आजूबाजूला झाडांची संख्या खूप असल्याने वातावरणात गारवा राहत असल्याने सर्व पक्षी दाणे खाऊन, पाणी पिऊन आनंदाने दिवसभर किलबिलाट करत असतात.

Variety of fruit trees planted for birds | पक्षांसाठी लावली विविध प्रकारची फळ झाडे

पक्षांना दाणे टाकतांना प्रकाश अहिरे.

ठळक मुद्देब्राह्मणगाव : अंगणात पाण्याची अन् धान्याची केली व्यवस्था

ब्राह्मणगाव : एकीकडे सर्वत्र चिमणी व अन्य प्रकारच्या पक्षांची संख्या कमी होत असताना येथील निसर्गप्रेमी पदवीधर शेतकरी प्रकाश अहिरे यांनी आपल्या शेतातील बंगल्याजवळ अनेक प्रकारची फुले, फळ झाडे लावून पक्ष्यांसाठी पाणी व धान्याची व्यवस्था केल्याने त्यांचे शेतात सद्या शेकडोच्या संख्येने चिमणी, कावळे, साळुंकी व अन्य पक्षी दररोज येत आहेत. आजूबाजूला झाडांची संख्या खूप असल्याने वातावरणात गारवा राहत असल्याने सर्व पक्षी दाणे खाऊन, पाणी पिऊन आनंदाने दिवसभर किलबिलाट करत असतात.
अहिरे यांना विविध प्रकारची झाडे लावण्याची तसेच पशुपक्षांची आवड आहे. त्यांनी पक्ष्यांसाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. तसेच ते पक्षांसाठी दररोज दाणे टाकतात, पाणी ठेवतात. पक्षांसोबत तेथे मांजर, कुत्राअसून पक्षांचे रोजचे येणे खेळणे पाहून तेही त्या पक्षांसोबत रममान झाले आहे. सर्वत्र कडक ऊन, तापमान वाढलेले असताना येथे मात्र झाडांची दाट गर्दी असल्याने सुखद गारव्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट मनाला सुखद आनंद देऊन जातो.
चिमणी, कावळा, साळुंकी अन्य रंगी बेरंगी पक्षी एकत्र येऊन पाण्याचा व दाणे खाऊन झाडावर विसावतात हा खरा आनंद असल्याचे प्रकाश अहिरे यांनी सांगितले.
प्रतिक्रि या : ब्राह्मणगाव येथील माझ्या शेतातील बंगल्याजवळ दाट झाडी असल्याने शेकडो विविध प्रकारचे पक्षी येऊन धान्य खातात तसेच पिण्याचे पाण्याची व्यवस्था केली असल्याने दिवसभर पक्षांची किलबिलाट मनाला वेगळा आनंद देऊन जातो.
- प्रकाश अीहरे, पक्षी व वृक्ष प्रेमी.

Web Title: Variety of fruit trees planted for birds

टॅग्स :Waterपाणी