शालेय विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 01:07 IST2020-12-03T20:24:56+5:302020-12-04T01:07:37+5:30
पेठ : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आमलोण येथील शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी अतिदुर्गम भागांत मिशन जलपरिषद मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आमलोन येथील शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होत एकाच दिवशी सहा वनराई बंधारे बांधले आहेत. यामुळे परिसरात त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

पेठ तेलुक्यातील आमलोण येथे वनराई बंधाऱ्यासमवेत शालेय विद्यार्थी.
पेठ : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आमलोण येथील शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी अतिदुर्गम भागांत मिशन जलपरिषद मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आमलोन येथील शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होत एकाच दिवशी सहा वनराई बंधारे बांधले आहेत. यामुळे परिसरात त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
हरसूलजवळील तसेच पेठ तालुक्यातील आमलोण येथील शालेय विद्यार्थ्यांनी माउलीचा कुंड, खडकी, जामठीची पातळी, चारणवाडी झरी, जांभळीची पातळी, हुंबाट अशा सहा ठिकाणी वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे. परिसरात एकाच दिवशी श्रमदानातून बांधण्यात आलेल्या सहा वनराई बंधाऱ्यामुळे सर्वत्र चर्चा होत आहे.
याप्रसंगी शिक्षक रवि भोये, सुरेश गायकवाड, जीवन भरसट, तुषार दळवी, देवा दळवी, सचिन भरसट, सूरज भरसट, अशोक भरसट, भूषण भोये, कुंदन भरसट, निरंजन भोये तसेच कृषी सहाय्यक टी. एम. मोरघरकर उपस्थित होते.