शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वनराई : सनई-चौघड्याच्या सूरात नाशिककरांनी साजरा केला वृक्षांचा ‘बर्थ-डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 16:57 IST

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आबालवृद्ध नाशिककरांचा सळसळता उत्साह अन् वृक्षप्रेम बघून ‘सह्याद्री देवराई’फेम अभिनेता सयाजी शिंदेदेखील हरखून गेले. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी नाशिककरांची जणू जत्राच भरली आहे, या शब्दांत शिंदे यांनी कौतुक केले. -

ठळक मुद्देदुर्मीळ जंगली झुडुपांची भर पडलीनाशिककरांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

नाशिक : ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ असे म्हणत शेकडो नाशिककरांचे हात हजारो झाडांचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी सरसावले. यावेळी सनई-चौघड्यांचा सूराने परिसर दुमदुमला. नाशिककरांनी म्हसरूळ येथील ‘वनराई’मध्ये जागतिक पर्यावरण दिनी मोठ्या संख्येने हजेरी लावून झाडांना खतपाणी घालून औक्षण केले तसेच जंगली झुडुपांच्या लागवडीसाठी योगदान दिले.निमित्त होते, नाशिक पश्चिम वनविभाग व आपलं पर्यावरण संस्थेच्या वतीने आयोजित पाचवा वनमहोत्सव अन् वचनपूर्ती सोहळ्याचे. वनविभागाच्या आगारामधील मोकळ्या भूखंडावर तीन वर्षांपूर्वी लोकसहभागातून लावण्यात आलेल्या सहा हजार झाडांची दमदार वाढ बघून नाशिककर समाधानी झाले. नागरिकांनी मोठ्या उत्साहाने स्वयंस्फूर्तीने पाण्याचे डबे, गांडूळ खत झाडांना वाढदिवसाचे ‘गिफ्ट’म्हणून दिले. नाशिककरांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांमध्ये वृक्ष चळवळीविषयी अधिकाधिक जागृती निर्माण व्हावी, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड व संगोपनाची आवड वाढावी या उद्देशाने आपलं पर्यावरण संस्था प्रयत्नशील आहे. शहरात ‘नाशिक देवराई’, ‘नाशिक वनराई’ हे दोन प्रकल्प साकारण्याचा सर्वप्रथम प्रयत्न या संस्थेकडून पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला. केवळ वृक्षारोपण न करता त्याच्या संवर्धनाची जबाबदारी प्रामाणिकपणे स्वीकारून संस्थेचे स्वयंसेवक वर्षभर ‘पर्यावरण दिन’ साजरा करतात.वनराईमधील दुर्मीळ प्रजातीच्या झाडांच्या सोबतीला आता दुर्मीळ जंगली झुडुपांची भर पडली आहे. वृक्षपूजा व औक्षणाप्रसंगी महापौर रंजना भानसी, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, उपवनसंरक्षक शिवाजी फुले, वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे, लेखक अरविंद जगताप, सभागृहनेता दिनकर पाटील, नगरसेवक रूची कुंभारकर, सतीश सोनवणे, दीपाली कुलकर्णी, गायक संजय गिते, संस्थेचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांच्यासह नागरिक उपस्थित होते.-नाशिककरांचे सयाजी शिंदेंकडून कौतुकवनमहोत्सवांतर्गत वनराईमध्ये झुडुपांच्या २७ प्रजातींची पाचशे रोपे लावण्यात आली. नागरिकांनीदेखील येताना सोबत एक-एक रोपटे आणल्याने दिवसभरात साडेतीनशे रोपांचीही लागवड झाली. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आबालवृद्ध नाशिककरांचा सळसळता उत्साह अन् वृक्षप्रेम बघून ‘सह्याद्री देवराई’फेम अभिनेता सयाजी शिंदेदेखील हरखून गेले. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी नाशिककरांची जणू जत्राच भरली आहे, या शब्दांत शिंदे यांनी कौतुक केले.-लावलेली वृक्ष वाऱ्यावर सोडून देणे हा या संस्थेचा मुळीच उद्देश नाही. भारतीय प्रजातीच्या झाडंझुडुपांच्या लागवडीमागे जैवविविधतेची जोपासना हा मूळ हेतू आहे. त्या दृष्टीने नाशिक देवराई, वनराईमध्ये रोपांची लागवड आणि संगोपनावर संस्थेकडून भर दिला जात आहे.- शेखर गायकवाड, पर्यावरणप्रेमी

टॅग्स :Nashikनाशिकenvironmentवातावरणforest departmentवनविभाग