टाकळी विंचूर येथे लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 00:57 IST2021-04-29T23:06:01+5:302021-04-30T00:57:58+5:30
लासलगाव : परिसरातील टाकळी विंचूर येथे लसीकरण मोहिमेचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, निफाड पंचायत समितीचे सदस्य शिवा पाटील सुरासे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

टाकळी विंचूर येथे लसीकरण मोहिमेच्या शुभारंभप्रसंगीजिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, निफाड पंचायत समितीचे सदस्य शिवा पाटील सुरासे, वैद्यकीय अधिकारी राहुल लोणारी, विस्तार अधिकारी सुधाकर सोनवणे, सरपंच अश्विनी जाधव आदी उपस्थित होते.
लासलगाव : परिसरातील टाकळी विंचूर येथे लसीकरण मोहिमेचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, निफाड पंचायत समितीचे सदस्य शिवा पाटील सुरासे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी राहुल लोणारी, विस्तार अधिकारी सुधाकर सोनवणे, सरपंच अश्विनी जाधव, उपसरपंच ज्ञानेश्वर मोकाटे, ग्रामपंचायत सदस्य केशव जाधव, राम बोराडे, संतोष राजोळे , नाना राजगिरे, अशोक आमले, अनिल माळी, ग्रामसेवक एन. एम. कदम आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
टाकळी विंचूर आरोग्य उपकेंद्राच्या कासार , डॉ. दामिनी रसाळ, सविता पवार, सविता चव्हाण, सीमा राजोळे, उज्ज्वला राजोळे, भाऊसाहेब केने, उज्ज्वल निळे, प्रकाश संसारे, निसार शेख, सुलतान शेख, सुनील गायकवाड, आदींसह आरोग्य विभागाच्या व ग्रामपंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांचे या लसीकरण मोहिमेप्रसंगी सहकार्य लाभले. यावेळी साठ वर्षांच्या पुढील २०० नागरिकांना लसीकरण करण्यात आले.