गावठी कट्ट्याचा वापर करत  गुंडाकडून गोळीबाराचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 01:12 AM2019-04-18T01:12:07+5:302019-04-18T01:12:24+5:30

मखमलाबाद या गावात सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्ट्याचा वापर करत दहशत माजविण्यासाठी हवेत गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी जिवंत काडतूस ताब्यात घेतले आहे. गोळीबार करणारा सराईत गुंड संशयित सोमनाथ बर्वे घटनास्थळावरून फरार झाला आहे.

 Using bullet holes to try gunfire | गावठी कट्ट्याचा वापर करत  गुंडाकडून गोळीबाराचा प्रयत्न

गावठी कट्ट्याचा वापर करत  गुंडाकडून गोळीबाराचा प्रयत्न

Next

नाशिक/मातोरी : मखमलाबाद या गावात सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्ट्याचा वापर करत दहशत माजविण्यासाठी हवेत गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी जिवंत काडतूस ताब्यात घेतले आहे. गोळीबार करणारा सराईत गुंड संशयित सोमनाथ बर्वे घटनास्थळावरून फरार झाला आहे.
गावातील पाण्याच्या जलकुंभाजवळ महिला पिण्याचे पाणी घेण्यासाठी जातात. त्याठिकाणी बर्वे हा त्याच्या काही टवाळखोर मद्यपी साथीदारांसमवेत बसून ‘ओली पार्टी’ रंगविण्याचा प्रयत्न करत होता. त्यास गावकरी पांडुरंग चारस्कर यांनी पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभाजवळ बसण्यास विरोध केला असता बर्वे याने त्यांना शिवीगाळ करत काढता पाय घेतला. सोमवारी (दि.१५) सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर चारस्कर हे वाहनातून उतरत असताना बर्वे याने त्यांच्यावर हल्ला चढविला. स्वत:जवळील गावठी कट्ट्याने भीती दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी कट्ट्यातून जिवंत काडतूस घटनास्थळी पडल्याने ते नागरिकांना आढळून आले. गावकऱ्यांनी एक काडतूस पोलिसांच्या हवाली केले आहे. याप्रकरणी चारस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपअधीक्षक शिवकुमार ढोले करीत आहेत.
स्कॉर्पिओ पेटविण्याचा प्रयत्न
जलकुंभाजवळ बसून मद्यप्राशन करण्यास विरोध केला म्हणून चारस्कर यांच्यावर खुन्नस धरून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने बर्वे याने गोळीबार केला. तसेच त्याच रात्री त्यांची स्कॉर्पिओ मोटार पेटवून देण्याचाही प्रयत्न झाला.
४विशेष म्हणजे चारस्कर यांच्या घरी अवघ्या दोन दिवसांनंतर लग्नसोहळा आहे. त्याची तयारी सुरू असताना बर्वेकडून अशाप्रकारे हल्ला व मोटार पेटविण्याच्या झालेल्या प्रयत्नामुळे हे कुटुंब व त्यांचे नातेवाईक दहशतीखाली सापडले आहे.
लोड करताना पडले काडतूस
मातोरी गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग चारस्कर यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने काढलेला गावठी कट्टा संशयित बर्वे याने काडतुसाने लोड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतल्याने अंधारात त्याच्याकडून काडतुस जमिनीवर पडले. यामुळे चारस्करांवरील हल्ला टळला.

Web Title:  Using bullet holes to try gunfire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.