शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीतील प्रगतिशील शेतकऱ्यांचा प्रयोग

By admin | Updated: December 19, 2014 23:43 IST

प्लॅस्टिक आच्छादनाचा प्रयोग राज्यभर राबविणार

 दिंडोरी तालुका हा प्रयोगशील तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला असून, शासनाने विविध योजना राबविताना दिंडोरीला प्राधान्य दिले आहे. गारपीट, बेमोसमी पावसाच्या दीर्घकालीन उपाययोजनेतही तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेला प्लॅस्टिक आच्छादनाचा प्रयोग राज्यभर राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.दिंडोरी तालुक्यातील डोंगरदऱ्यात फुले-फळे द्राक्षाची लागवड करत येथील शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने प्रगती केली आहे. पॉलिहाऊस शेड नेट आदि विविध प्रयोग राबविले आहे. गेल्या चार-पाच वर्षापासून सातत्याने होणारा हवामानातील बदल अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या विकासाला बाधा आणली आहे. गेल्या वर्षी बेमोसमी पाऊस व थंडीने अनेक निर्यातक्षम द्राक्षबागांना मोठा फटका बसल्याने निर्यातदार द्राक्ष बागाईतदारांचे लाखोंचे नुकसान झाले होते. या नुकसानीची झळ खाल्लेल्या शेतकऱ्यांनी ज्या देशांमध्ये बारमाही पाऊस पडूनही तेथील शेतकरी कसे शेती करतात याची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळविली. काहींनी थेट त्या देशातील बागांना भेटी देत शेतकऱ्यांशी संवाद साधत माहिती जाणून घेतली. मातेरेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी सदाशिव शेळके यांनी तर दहा वर्षांपूर्वीचा प्लॅस्टिक आच्छादनाचा प्रयोग केला होता मात्र सदर कागद योग्य पद्धतीचा नसल्याने सूर्यप्रकाश मिळण्यात हवा खेळती राहण्यात अडचणी निर्माण होऊन हा प्रयोग काहीसा असफल झाला होता. मात्र त्यांनी नवनवीन प्रयोग सुरूच ठेवला होता. त्यांनी त्यांचे बागेवर शेडनेट टाकत बागेचा बचाव केला आहे.यामुळे केवळ थंडी वारा ऊन याचेपासून बचाव झाला मात्र बेमोसमी पावसाचा फटका बसत आहे. त्यावर पॉलिपेपर आच्छादन हा पर्याय असून, शेळके यांनी इस्राईल, इटली, स्पेनचा दौरा करत या प्रयोगाचा अभ्यास केला .इटली व स्पेन मध्ये खाण्याच्या द्राक्षबागा या १०० टक्के पॉलिआच्छादन असलेल्या आहेत, तर फक्त वाइनच्या बागा खुल्या आहेत. पॉलिआच्छादनाममुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी होत कमी औषधे फवारणी करावी लागत असून, चांगल्या प्रतीचे द्राक्ष उत्पादन होतो. तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी हा प्रयोग राबविला असून, सोनजांब येथील युवा प्रगतिशील शेतकरी शैलेश जाधव यांनी हा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला यंदा त्यांचे बागेवर त्यांनी ८० टक्के हे पॉलिथिन पेपरचे आच्छादन दिले झालेल्या गारपिटीमध्ये तेवढ्या बागेचे काहीही नुकसान झाले नाही तर उर्वरित २० टक्के बागेचे नुकसान झाले. हा गारपीट व अवकाळी पावसावर दीर्घकालीन उपाय असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या बागेस भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या शेतकऱ्यांनी तसेच द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी मुख्यमंत्री फडवणीस यांना हा प्रयोग राबविताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. मुख्यमंत्री यांनीही याबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखवत सदर योजना अंबलबजावणीसाठी शासन पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहे . फोटो - मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस शेतकर्यांशी चर्चा करताना