शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

केळी पिकविण्यास कार्बाईडचा बेसुमार वापर

By admin | Updated: March 1, 2015 23:13 IST

व्यापाऱ्यांचा खेळ : कर्करोग, पोटाचे विकार वाढले; प्रशासनाकडून कारवाईची गरज

अशोक डोंबाळे - सांगलीतील व्यापारी केळाला चांगला रंग येण्यासाठी कार्बाईडचा वापर करीत आहेत. कार्बाईडचा वापर करून पकविलेली केळी खाणाऱ्यांना कर्करोग, पोटाचे गंभीर विकार होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.केळी, आंबा, चिकू या तीनही फळपिकातून ठोस उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकरी मोठ्याप्रमाणात तिकडे वळू लागला आहे. परंतु, या शेतकऱ्यांना फळे व्यापाऱ्यांनी बदनाम करण्यास सुरुवात केली आहे. व्यापारी कोकणातील शेतकऱ्यांकडून आंबे विकत घेऊन फळाला चांगला रंग येण्यासाठी कार्बाईडचा वापर करीत होते. यामुळेच गेल्यावर्षी परदेशात देवगड हापूस आंबा नाकारला गेला. आंब्यावर बंदी घातली होती. कार्बाईडसह अन्य रसायने वापरून आंबा पिकविणार नसल्याची हमी केंद्र आणि राज्य शासनाने दिल्यामुळे यावर्षी आंब्याची निर्यात होणार आहे. आंबा उत्पादक आणि निर्यात करणारे व्यापारी बऱ्याच वर्षानंतर आता जागे झाले आहेत.तसेच शेतकऱ्यांकडून हिरवी केळी किलोवर घेतली जातात. सात ते पंधरा रुपये किलोने व्यापारी ती शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. ही केळी पिकविण्यासाठी आणि त्याला पिवळा रंग येण्यासाठीही कार्बाईडचा मोठ्याप्रमाणात वापर होत आहे. कार्बाईड पाण्यामध्ये मिसळून त्यामध्ये केळीचे घड बुडवून बंद खोलीत थप्पी मारली जाते. त्यामुळे केळांना पिवळा रंग येतो. पण ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. सांगली शहरासह इस्लामपूर, तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, विटा, मिरज शहरातही कार्बाईडच्या साहाय्यानेच केळी पिकविली जात आहेत. सध्या बाजारात येणारी ८५ टक्के केळी कार्बाईडयुक्त पाण्यात भिजवूनच पिकवली जात आहेत. ही केळी खाणे म्हणजे कर्करोगाला निमंत्रण दिल्यासारखे आहे. यामुळे पोटाचे विकार तर शंभर टक्के होतातच, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी केळी पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर करणे बंद करून नागरिकांच्या जिवाशी खेळणे थांबवावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. कार्बाईडचा असाच वापर सुरु राहिल्यास नागरिकच अशा केळांवर बहिष्कार घालतील, अशी स्थिती आहे. कार्बाईडचा असा केला जातो वापरकार्बाईड पाण्यात मिसळले, तर उष्णता तयार होऊन गॅस तयार होतो. खेड्यात आणि शहरातही छोट्या टँकमधील पाण्यात कार्बाईड मिसळतात. यामध्ये केळींचा घड बुडवून काढला जातो. त्यावेळी ही उष्णता केळात उतरते आणि त्यामुळे केळी पिकतात. कार्बाईडचा अनिर्बंध वापर होतो. त्यामुळे अतिरिक्त उष्णता केळांमध्ये साठून राहते व ती पोटात जाते. त्यामुळे पचनसंस्थेमध्ये बिघाड होऊ शकतो. भविष्यात कर्करोगासही बळी पडू शकतो.कार्बाईडचा वापर कसा ओळखाल?जेव्हा केळी नैसर्गिकरित्या पिकवली जातात, त्यावेळी त्याचे देठ कोमेजते (काळे पडते). नैसर्गिकरित्या पिकविलेल्या केळांचा रंग गर्द पिवळा असतो आणि त्याच्यावर थोडेफार काळे डाग असतात. तीच केळी कार्बाईडचा वापर करून पिकवली असतील, तर त्यांचे देठ हिरवे असते आणि केळींचा रंग हिरवट पिवळा दिसतो. केळावर डाग नसतात.