अमेरिकेचे वाणिज्यदुत डेविड रॅन्झ गोदाकाठावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 15:44 IST2020-11-15T15:42:28+5:302020-11-15T15:44:53+5:30
रॅन्झ यांनी यावेळी गंगा-गोदावरी मंदिराचे महत्व व कुंभमेळ्याची माहिती जाणून घेतली. पुरोहित संघ व गंगा गोदावरी मंदिराच्या वतीने शाल,श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

अमेरिकेचे वाणिज्यदुत डेविड रॅन्झ गोदाकाठावर
नाशिक :भारतातील अमेरिकेचे वाणिज्य दुत डेविड रॅन्झ हे रविवारी (दि.१५) अचानकपणे सपत्नीक नाशिक दौऱ्यावर आले. त्यांनी पंचवटीतील काळाराम मंदिरासह तपोवन परिसरात भेट देत पाहणी केली.
डेविड यांनी २७ ऑगस्ट २०१९ साली भारतात अमेरिकेचे वाणिज्य दुतचा (कॉन्सल जनरल) पदभार स्विकारला आहे. त्यांचे मुंबई येथे मुख्य कार्यालय आहेत. आंतरराष्ट्रीय आर्थिक कामगिरीसाठी त्यांना २००४ साली अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने हार्बट सालझमन पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच युएस आर्मी कमांडर ऑफ पब्लीक सर्वीसेसचा पुरस्कारही देण्यात आला होता.