जिल्ह्यात युरिया कमी पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:17 IST2020-07-14T20:23:19+5:302020-07-15T01:17:21+5:30
दरेगाव : जिल्ह्यात कुठेही युरिया खत कमी पडू न देता योग्य दरात विक्र ी करण्याची ग्वाही कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. ज्यादा दराने खते विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

जिल्ह्यात युरिया कमी पडू देणार नाही
दरेगाव : जिल्ह्यात कुठेही युरिया खत कमी पडू न देता योग्य दरात विक्र ी करण्याची ग्वाही कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. ज्यादा दराने खते विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
भुसे यांनी चांदवड तालुक्यातील प्रक्षेत्र भेटीत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व खते किंवा बि-बियाणे यासह इतर कोणत्याही बाबतीत अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. खतांचा मुबलक साठा उपलब्ध असून, चिंता करू नका, असा दिलासा शेतकºयांंना दिला. त्यांनी विविध योजनांतील कामांची पाहणी केली. क्षेत्रीय भेटीनंतर शिंगवे येथे तालुका कृषी विभागाच्या वतीने आयोजित आढावा बैठकीला ते उपस्थित राहिले. त्यांनी तालुक्यातील सर्व विभागांचा आढावा घेतला. यावेळीआमदार सुहास कांदे, चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, नितीन आहेर, शांताराम ठाकरे, मनोज शिंदे उपस्थित होते.
--------------------
नांदगावी गावांना भेट
नांदगाव : तालुक्यातील भार्डी, अनकवाडे आदी गावांना ये कृषी मंत्री दादा भुसे यांनी भेट दिली. आमदार सुहास कांदे यांच्या समवेत होते. भार्डी येथील शेतकरी ज्ञानेश्वर सोमनाथ लगदिरे यांचे शेताच्या बांधावर जाऊन मूग पिकावर होणारा किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्यावर नियंत्रण आणण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांबदद्ल शेतक-यांशी चर्चा केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटिल, किरण देवरे, प्रमोद भाबड आदी उपस्थित होते.